NASA च्या Private Axiom Mission 4 चं नेतृत्त्व करणार Wing Commander Shubhanshu Shukla
नासाचे 'स्पेस एक्स ड्रॅगन' अवकाशात घेऊन जाणार आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून हे यान उड्डाण करणार आहे.
इंडियन एअर फोर्स (Indian Air Force) ऑफिसर (Shubhanshu Shukla) लवकरच इतिहास रचणार आहे. तो इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station) मध्ये जाणारा तो पहिला भारतीय आहे. एक प्रायव्हेट मिशन साठी तो अंतराळामध्ये जाणार आहे. या वर्षी एप्रिल ते जून दरम्यान ते अवकाशात जाणार असून तो 14 दिवसांचा प्रवास असणार आहे.
शुंभाशू शुक्ला ला भारताच्या 'गगनयान' स्पेस मिशन मध्येही निवडला होता. आता भारताच्या या मोहिमेपूर्वी शुभांशची एक्सियम मिशन-4 (Ax-4) साठी निवड झाली आहे. नासाने गुरुवारी त्याच्या नावाची घोषणा केली. यावेळी या मोहिमेवर जाणारे चार अंतराळवीरही नासाच्या पत्रकार परिषदेला बसले होते.
या मिशनमध्ये शुभांशची पायलट म्हणून निवड झाली आहे. तो नासाचे 'स्पेस एक्स ड्रॅगन' अवकाशात घेऊन जाणार आहे. फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून हे यान उड्डाण करणार आहे. या मिशनमध्ये चार लोक असतील. हे मिशन नासाच्या पूर्व अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. ती Axiom Space साठी मानवी अंतराळ उड्डाणाची संचालक आहे. पोलंडचे स्लावोज उझनान्स्की-विझनीव्स्की आणि हंगेरीचे टिबोर कापू हे देखील मिशन तज्ञ म्हणून या मोहिमेत जाणार आहेत.
पत्रकार परिषदेत पायलट शुभांशू यांनी सांगितले की, ते ज्या मिशनवर जात आहेत, त्यामध्ये ते काही भारतीय खाद्यपदार्थही सोबत घेऊन जातील आणि आपल्या सहकाऱ्यांनाही खाऊ घालतील. अंतराळात योगासने करण्याबाबतही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, 'मायक्रोग्रॅव्हिटीमध्ये जाण्यासाठी आणि स्वतःहून अंतराळ उड्डाणाचा अनुभव घेण्यासाठी मी खरोखरच उत्साहित आहे. मिशनचा उत्साह सतत वाढत आहे आणि मला वाटते की आपण अशा टप्प्यावर आहोत जिथे सर्व काही खरे होत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 09:50 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

