Wedding At Rashtrapati Bhavan: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला सीआरपीएफ अधिकारी Poonam Gupta डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत बांधणार लग्नगाठ

मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनमच्या सौम्य वागण्याने, मवाळ बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठेने प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे लग्न होणार असल्याचे कळताच त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राउन कॉम्प्लेक्स येथे त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

Wedding At Rashtrapati Bhavan: देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात पार पडणार विवाहसोहळा; 12 फेब्रुवारीला सीआरपीएफ अधिकारी Poonam Gupta डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत बांधणार लग्नगाठ
Rashtrapati Bhavan | (Photo Credit: Rashtrapatisachivalaya)

देशातील सर्वात प्रतिष्ठित ठिकाणी, राष्ट्रपती भवनात (Rashtrapati Bhavan) पहिल्यांदाच एक महिला सीआरपीएफ अधिकारी विवाहबद्ध होणार आहे. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा क्राऊन कॉम्प्लेक्समध्ये प्रथमच शहनाईचा आवाज गुंजणार आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील पूनम गुप्ता (Poonam Gupta) हिचा विवाह या संकुलात होणार आहे. पूनम गुप्ता सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट आहे, व ती  राष्ट्रपतींच्या सुरक्षेत तैनात आहे. येत्या 12 फेब्रुवारीला, जम्मू-काश्मीरमध्ये तैनात सीआरपीएफचे डेप्युटी कमांडंट अवनीश कुमारसोबत पूनमचे ​​लग्न होत आहे. या लग्नसोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे लोकच उपस्थित राहणार आहेत. पूनमचे ​​वडील रघुवीर गुप्ता हे शिक्षक आहेत. प्रोटोकॉलचा हवाला देत पूनम आणि तिच्या कुटुंबीयांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.

असिस्टंट कमांडंट पूनमचे ​​वडील शिवपुरीच्या श्रीराम कॉलनीत राहतात. ते नवोदय विद्यालय मगरौणी येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पूनमच्या सौम्य वागण्याने, मवाळ बोलण्याने आणि कर्तव्यनिष्ठेने प्रभावित झाल्या आहेत. पूनमचे ​​लग्न होणार असल्याचे कळताच त्यांनी राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा, क्राउन कॉम्प्लेक्स येथे त्यांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. अहवालानुसार या लग्नाबाबत व्यवस्था करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. मात्र याबाबत अद्याप राष्ट्रपती भवनकडून अधिकृत माहिती प्राप्त नाही. (हेही वाचा: HC on Marriage Between Hindus: 'दोन हिंदूंमधील विवाह एक पवित्र बंधन, एका वर्षात संपुष्टात येऊ शकत नाही'; Allahabad High Court ने फेटाळली जोडप्याची घटस्फोटाची याचिका)

सहाय्यक कमांडंट पूनम गुप्ता हिने 2024 साली प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केले. पूनम गुप्ता गणित विषयात पदवीधर आणि इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवीधर आहे. तिने ग्वाल्हेरच्या जिवाजी विद्यापीठातून बीएडही केले. ती जवाहर नवोदय विद्यालय, श्योपूरची माजी विद्यार्थिनी आहे. पूनमने UPSC CAPF परीक्षा-2018 मध्ये 81 वा क्रमांक मिळवला आणि सीआरपीएफमध्ये असिस्टंट कमांडंट बनली. हे लग्न खूप खास आहे कारण हा विवाह सोहळा राष्ट्रपती भवनात होणार आहे, तोही राष्ट्रपतींसारख्या महान व्यक्तिमत्त्वाच्या उपस्थितीत.

(टीप- ही बातमी इंटरनेट आधारीत आहे. लेटेस्टली मराठी या वृत्ताची पुष्टी करत नाही) 

(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 04:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).