Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजमधील व्यक्तीशी जुळला
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी जुळला आहे. एफएसएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा चेहरा ओळखला आहे.
Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खानविरुद्धच्या खटल्यातील (Saif Ali Khan Attack Case) अटक केलेल्या आरोपींबद्दल अनेक दिवसांपासून लोक शंका व्यक्त करत होते. सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला की, अटक केलेल्या व्यक्तीचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमधील आरोपीशी जुळत नाही. पण आता या प्रकरणातील मोठा खुलासा समोर आला आहे. आरोपी शरीफुल इस्लाम (Shariful Islam) चा चेहरा ओळखण्या संदर्भातील चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामुळे, सीसीटीव्हीमध्ये दिसणारा आरोपी शरीफुल इस्लाम असल्याचे पुष्टी झाली आहे.
CCTV फुटेजशी जुळला मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा -
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी जुळला आहे. एफएसएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा चेहरा ओळखला आहे. यापूर्वी, हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी असल्याचे पुरावे सापडले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्याचे बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सापडले होते. त्यात त्याचे नाव शरीफुल इस्लाम असे लिहिले आहे. त्यांच्या वडिलांचे नाव मोहम्मद रुहुल अमीन आहे. (हेही वाचा -Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला अटक; आरोपीसोबत काय कनेक्शन? वाचा सविस्तर वृत्त)
शरीफुल इस्लामला मुंबई पोलिसांकडून अटक -
मुंबई पोलिसांनी गेल्या रविवारी बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली होती. आरोपी विजय दास या नावाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. तो बांगलादेशातील बरिसाल शहरातील रहिवासी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होतो. तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये सामील झाला होता आणि तिथे तो छोटी-छोटी कामे करत होता. आरोपी सात महिन्यांपूर्वी डावकी नदी बेकायदेशीरपणे ओलांडून भारतात आला होता. काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर, तो नोकरीच्या शोधात मुंबईत आला. (हेही वाचा -Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात ट्विस्ट; वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही)
सध्या आरोपी न्यायालयीन कोठडीत -
सैफ अली खानवर चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या शरीफुल इस्लामला यापूर्वी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली होती. आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यासाठी कोणतेही नवीन कारण नसल्याचे वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टाने सांगितले होते. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामची पोलिस कोठडी संपल्यानंतर त्याला वांद्रे मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले. पोलिसांनी चौकशीसाठी आणखी दोन दिवसांची कोठडी मागितली, परंतु न्यायालयाने ती फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आरोपी दहा दिवसांपेक्षा जास्त काळ पोलिस कोठडीत होता आणि तपास पूर्ण झाल्याचे रेकॉर्डवरून दिसून येते. जर कोणतेही नवीन पुरावे समोर आले तर पोलिस आरोपीचा पुन्हा रिमांड मागू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Jan 31, 2025 01:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

