Saif Ali Khan Attack Case: सैफ अली खान हल्ला प्रकरणी बंगालमधून महिलेला अटक; आरोपीसोबत काय कनेक्शन? वाचा सविस्तर वृत्त
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगालच्या नादिया जिल्ह्यात शोध मोहीम राबवून एका महिलेला अटक (Arrest) केली. या महिलेचे नाव खुखुमोनी जहांगीर शेख असून ती अटक केलेल्या बांगलादेशी शरीफुल फकीरच्या ओळखीची असल्याचं सांगण्यात येत आहे.
Saif Ali Khan Attack Case: अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) वरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) बंगालच्या नादिया जिल्ह्यात शोध मोहीम राबवून एका महिलेला अटक (Arrest) केली. पोलिस तपासात असे दिसून आले की, हल्ल्यासाठी मुंबईत अटक केलेल्या बांगलादेशी नागरिकाने वापरलेले सिम कार्ड महिलेच्या नावावर नोंदणीकृत होते. प्राप्त माहितीनुसार, मुंबई पोलिसांचे दोन सदस्यांचे पथक रविवारी बंगालमध्ये पोहोचले. पोलिसांनी सैफ अलीवरील हल्ल्याप्रकरणी जिल्ह्यातील छपरा येथील एका महिलेला अटक केली. या महिलेचे नाव खुखुमोनी जहांगीर शेख असून ती अटक केलेल्या बांगलादेशी शरीफुल फकीरच्या ओळखीची असल्याचं सांगण्यात येत आहे.
फकीरने सिलीगुडीजवळील भारत-बांगलादेश सीमेवरून बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता आणि तो या महिलेच्या संपर्कात आला होता. ही महिला बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अंदुलिया येथील रहिवासी आहे. सोमवारी पोलिसांनी तिला ट्रान्झिट रिमांडवर मुंबईला नेले. (हेही वाचा -Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात ट्विस्ट; वांद्रे येथील निवासस्थानातून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपीच्या बोटांच्या ठशांशी जुळले नाही)
सैफवर चाकूने सहावेळा वार -
दरम्यान, 16 जानेवारी रोजी सैफ अली खानच्या मुंबईतील वांद्रे येथील निवासस्थानी एका हल्लेखोराने अभिनेत्यावर सहा वेळा चाकूने वार केले. सैफला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर उपचार करण्यात आले. 21 जानेवारी रोजी त्यांला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. (हेही वाचा -Nitesh Rane On Saif Ali Khan: सैफ अली खानवर खरोखर चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न)
सैफची प्रकृती आता सुधारणा -
डॉक्टरांनी सांगितले आहे की, चाकूचा घाव अभिनेत्याच्या मणक्याजवळ होता. चाकू त्याच्या पाठीच्या कण्यापासून फक्त 2 मिमी अंतरावर होता. सैफची प्रकृती आता सुधारत आहे. हल्ल्यानंतर अभिनेत्याला आठवडाभर विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 27, 2025 08:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

