Saif Ali Khan Stabbing Case: अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ला प्रकरणात (Saif Ali Khan Stabbing Case) आता नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण, वांद्रे येथील निवासस्थानातून (Bandra Residence) गोळा केलेले बोटांचे ठसे (Fingerprints) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) अटक केलेल्या आरोपी शरीफुल इस्लामशी जुळत नाहीत. पोलिस सूत्रांचा हवाला देत अनेक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) फिंगरप्रिंट ब्युरोने सिस्टीम-जनरेटेड अहवालात असे सिद्ध झाले आहे की खानच्या घरातून गोळा केलेल्या 19 बोटांच्या ठशांपैकी एकही बोटांचा ठसा शरीफुलशी जुळत नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून शरीफुल इस्लामी या व्यक्तीला अटक केली होती.
बोटांचे ठसे जुळले नाहीत -
सीआयडीने चाचणीचे निकाल निगेटिव्ह आल्याची माहिती दिल्यानंतर, मुंबई पोलिसांनी पुढील चाचणीसाठी आणखी नमुने पाठवले आहेत. सैफ अली खानच्या घराच्या पायऱ्यांवरून मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजचा वापर करून आरोपीची ओळख पटवण्यासाठी 19 जानेवारी रोजी मुंबई पोलिसांनी 30 वर्षीय शरीफुल इस्लामला अटक केली होती. (हेही वाचा -Nitesh Rane On Saif Ali Khan: सैफ अली खानवर खरोखर चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न)
संशयिताच्या पोलिस कोठडीत वाढ -
आरोपीला वाढीव कोठडी देण्याची मागणी करत, मुंबई पोलिसांनी 24 जानेवारी रोजी वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारा तोच व्यक्ती आहे हे निश्चित करण्यासाठी शरीफुलचा चेहरा ओळखण्याची चाचणी घेणे आवश्यक आहे. शरीफुलच्या वडिलांनी असा दावा केला आहे की, हल्ल्यानंतर प्रसारित झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्ती त्यांच्या मुलासारखी दिसत नाही. (हेही वाचा - Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान चाकूहल्ला प्रकरणातील आरोपीच्या पोलिस कोठडीत 29 जानेवारीपर्यंत वाढ)
शरीफुल बांगलादेशी नागरिक -
पोलिसांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, शरीफुल हा बांगलादेशी नागरिक असून त्याने आपले नाव विजय दास असे बदलले होते. त्याने सात महिन्यांपूर्वी भारतात बेकायदेशीरपणे प्रवेश केला होता. त्याच्यावर चोरीच्या उद्देशाने 54 वर्षीय अभिनेत्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात आणखी काही लोकांचा सहभाग असल्याचाही पोलिसांना संशय आहे.