Accused who attacked Saif Ali Khan (फोटो सौजन्य - X)

Saif Ali Khan Stabbing Case: सैफ अली खान (Saif Ali Khan) वर झालेल्या चाकूहल्ला प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुल इस्लाम 29 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत (Police Custody) राहणार आहे. या घटनेसंदर्भातील महत्त्वाचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असा युक्तिवाद पोलिसांनी केल्यानंतर मुंबईतील स्थानिक न्यायालयाने त्याच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली आहे.

आरोपींचे प्रतिनिधित्व करणारे वकील संदीप शेरखाने यांनी सांगितले की, आज पोलिसांनी आरोपीच्या पोलिस कोठडीची माहिती दिली आहे. आम्ही कोठडीच्या कालावधीवर आक्षेप घेतला आहे. शस्त्र आणि इतर सर्व गोष्टींबाबत आधीच चौकशी करण्यात आली आहे. न्यायालयात स्पष्टपणे म्हटले आहे की आरोपीशी संबंधित तपास पूर्ण झाला आहे. त्यामुळे, अधिक पोलिस कोठडीची आवश्यकता नाही. (हेही वाचा - Nitesh Rane On Saif Ali Khan: सैफ अली खानवर खरोखर चाकूने वार करण्यात आले होते की, तो फक्त नाटक करत होता? नितेश राणे यांनी उपस्थित केला प्रश्न)

आरोपीचा चेहरा CCTV मध्ये असलेल्या व्यक्तीशी जुळत नाही -

दरम्यान, आरोपीच्या वकिलांनी शरीफुल इस्लामचा चेहरा जुळत नसल्याचं म्हटलं आहे. चेहऱ्याची रचना सीसीटीव्हीमध्ये असलेल्या आरोपीपेक्षा पूर्णपणे वेगळी असल्याचंही त्यांनी म्हटल आहे. सैफ अली खानच्या वांद्रे येथील सतगुरु शरण इमारतीतील 12 व्या मजल्यावरील निवासस्थानी दरोड्याच्या प्रयत्नादरम्यान हल्लेखोराने सैफवर अनेक वेळा चाकूने वार केले. हल्ल्यानंतर, अभिनेत्याला ताबडतोब लीलावती रुग्णालयात नेण्यात आले जिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. (हेही वाचा - Saif Ali Khan Gets Discharged From Hospital: हल्ल्यानंतर अखेर सैफ अली खानला रुग्णालयातून डिस्चार्ज; पूर्ण विश्रांतीचा सल्ला)

आरोपीचे प्रतिनिधित्व करणारे वकील संदीप शेरखाने - 

सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज -

या आठवड्याच्या सुरुवातीला मंगळवारी, सैफला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्याला किमान दोन आठवडे विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सैफ अली खानने त्याला लीलावती रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या ऑटो ड्रायव्हरचीही भेट घेतली. ऑटो ड्रायव्हरसोबत अभिनेत्याचे अनेक फोटो व्हायरल झाले. भजन सिंग राणा असं या रिक्षा चालकाचं नाव आहे.