Lay's Potato Chip (फोटो सौजन्य - फेसबुक)

Lay's Potato Chip: लेज बटाट्याच्या चिप्स आपण नेहमी खात असतो. परंतु, आता या चिप्सबद्दल अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाने ( Food and Drug Administration) या उत्पादनांशी संबंधित काही घातक आरोग्य धोके असू शकतात, असे जाहीर केल्यानंतर अमेरिकेतून ले बटाट्याच्या चिप्सची (Lay Potato Chip) एक बॅच परत मागवण्यात आली आहे. प्रसिद्ध ब्रँड फ्रिटो-ले (Frito-Lay) द्वारे उत्पादित, या लेच्या बटाट्याच्या चिप्स सुरुवातीला नाममात्र जोखीम पातळीसह परत मागवण्यात आल्या होत्या. मात्र, अचानक संघीय आरोग्य अधिकाऱ्यांनी जोखीम पातळी वाढवली आणि दावा केला की, या दूषित उत्पादनांच्या बॅचच्या सेवनाशी संबंधित जीवघेणा धोका असू शकतो.

ले'ज बटाट्याचे चिप्स आरोग्यासाठी नवीन धोका?

ले'ज बटाट्याच्या चिप्सला सध्या नवीन जोखीम वर्गीकरणाला 'क्लास 1' असे संबोधले जात आहे, ज्याचा अर्थ सामान्यतः एफडीएने जाहीर केलेली रिकॉलची ही सर्वोच्च पातळी आहे. एफडीएनुसार, दुधाच्या संवेदनशीलतेची ऍलर्जी असलेल्या कोणालाही या बटाट्याच्या चिप्सच्या बॅचच्या सेवनाशी संबंधित आरोग्य धोक्यांना सामोरे जावे लागू शकते. (हेही वाचा - FDA Action On McDonald's: मॅकडोनॉल्डने 'चीज’च्या नावाखाली ग्राहकांची केली फसवणुक, अन्न आणि औषध प्रशासनाने दिला दणका)

लेज बटाट्याचे चिप्स खाल्लायने होऊ शकतो मृत्यू?

एफडीएनुसार, या ले'ज बटाट्याच्या चिप्सचे सेवन केल्याने गंभीर प्रतिकूल आरोग्य परिणाम किंवा मृत्यू देखील होऊ शकतो, असे न्यू यॉर्क पोस्टच्या अहवालात म्हटले आहे. दरम्यान, फ्रिटो-ले कंपनी अलीकडील सूचनेसह यावर काम करत आहे. तथापी, ले बटाट्याचे चिप्स खाल्लायने आतापर्यंत कोणत्याही गंभीर किंवा सौम्य ऍलर्जीक प्रतिक्रिया अद्याप नोंदवल्या गेल्या नाहीत. दरम्यान, कंपनी ग्राहकांना खात्री देण्याचा प्रयत्न करीत आहे की त्यांच्या उत्पादनांच्या इतर कोणत्याही बॅचमध्ये या विशिष्ट बॅचशी संबंधित समान आरोग्य धोके नाहीत. (हेही वाचा - लोणावळ्याच्या प्रसिद्ध 'मगनलाल चिक्की'चं उत्पादन थांबण्याचे FDA चे आदेश !)

ले'ज बटाट्याच्या चिप्स आरोग्यासाठी हानिकारक आहेत का?

कोणतेही बटाट्याचे चिप्स तेलात तळलेले असतात, ज्यामुळे आपल्या शरीरात कॅलरीज वाढतात. त्यामुळे बटाट्याच्या चिप्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते. ले'ज बटाटा चिप्सचे उत्पादन फ्रिटो-ले ही प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कंपनी करते.