शनिवार, ऑगस्ट 15, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Karachi Teacher Viral Video: ‘MMS स्कँडल’ च्या लिंक दिशाभूल करणाऱ्या आणि धोकादायक का आहेत? | मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांची आज पातळी: पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांमधील साठा 90.96 टक्क्यांच्या पार | Maharashtra FDA च्या कारवाईत 4 Domino’s आउटलेट्सचे परवाने रद्द, पहा कोणती आऊटलेट्स रडारवर |

IND vs ENG, 4th T20I Match 2025 Pitch Report And Weather Update: आज पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार चौथा टी-20 सामना, त्याआधी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून

तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे.

IND vs ENG, 4th T20I Match 2025 Pitch Report And Weather Update: आज पुण्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार चौथा टी-20 सामना, त्याआधी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामानाची स्थिती घ्या जाणून
IND vs ENG (Photo Credit - X)

पुणे: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड क्रिकेट संघ यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथा टी-20 सामना (IND vs ENG 4th T20I 2025) आज म्हणजेच 31 जानेवारी रोजी पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर (Maharashtra Cricket Association Stadium, Pune) खेळला जाईल. सामन्याला संध्याकाळी 7.00 वाजता सुरुवात होईल. तिसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा 26 धावांनी पराभव करून मालिकेत पुनरागमन केले. पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ अजूनही 2-1 ने पिछाडीवर आहे. या मालिकेत इंग्लंडची कमान जोस बटलरच्या खांद्यावर आहे. तर, टीम इंडियाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. (हे देखील वाचा: IND vs ENG 4th T20I 2025 Dream11 Prediction: ड्रीम इलेव्हनवर आज अशी बनवा तुमची टीम, 'या' ऑलराउंडरला बनवा कर्णधार)

खेळपट्टी अहवालावर एक नजर

पुण्याची खेळपट्टी काळ्या मातीची आहे. ही खेळपट्टी सामान्यतः फिरकीपटूंसाठी अनुकूल मानली जाते. येथे वेगवान गोलंदाजाला फारशी मदत मिळणार नाही. सुरुवातीला फलंदाजांना धावा काढण्यात काही अडचणी येतात. पण एकदा फलंदांज क्रीजवर स्थिरावलात की इथे धावा करणे सोपे होते. या मैदानावर नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. पुण्याच्या मैदानावर टी-20 मध्ये श्रीलंकेने बनवलेला सर्वोच्च धावसंख्या 206/6 आहे. तर भारताने सर्वात कमी 101 धावा केल्या आहेत.

कसे असेल हवामान ?

अ‍ॅक्यू वेदरच्या अहवालानुसार, भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या सामन्यात पावसाचा व्यत्यय येणार नाही. अहवालानुसार, 31 जानेवारी रोजी हवामानाचे तापमान 32 अंश असेल. पावसाची अजिबात शक्यता नाही. वारे ताशी 13 किलोमीटर वेगाने वाहतील. आर्द्रता 37 टक्के राहण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत, सामन्यादरम्यान हवामानाचा कोणताही परिणाम होणार नाही.

चौथ्या टी-20 सामन्यासाठी दोन्ही संघाची संभाव्य प्लेइंग 11

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ: अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ: बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अ‍ॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

Close
Latestly whatsapp channel