Vodafone World's First Satellite Video Call: व्होडाफोनने रचला इतिहास! सामान्य स्मार्टफोन वापरून केला जगातील पहिला उपग्रह व्हिडिओ कॉल, जाणून घ्या सविस्तर (Watch)
युरोपियन मोबाइल ऑपरेटरच्या सीआयओ मार्गारीटा यांना हा कॉल आला होता, जो कंपनीचे अभियंता रोवन यांनी केला होता. या तंत्रज्ञानामुळे, ज्या भागांमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही, तेथील वापरकर्तेही व्हिडिओ कॉल, इंटरनेट आणि ऑनलाइन मेसेजिंग सेवा वापरू शकतील.
Vodafone World's First Satellite Video Call: व्होडाफोन-आयडियाची (Vodafone-Idea) स्थिती भारतात चांगली नाही. जिओ आणि एअरटेलच्या एक ते दोन वर्षांनंतर व्होडाफोन-आयडियाकडून 5जी सेवा सुरू होत आहे. पण भारताबाहेर व्होडाफोनने (Vodafone) एक नवीन कामगिरी केली आहे. जग उपग्रहाद्वारे संदेश पाठवण्याची वाट पाहत असताना व्होडाफोनने इतिहास रचला आहे. व्होडाफोनने उपग्रहाद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ केल्याचा दावा केला आहे. अहवालानुसार, नुकतेच कंपनीने पहिल्यांदाच एक सामान्य स्मार्टफोन वापरून उपग्रहाद्वारे व्हिडिओ कॉल करण्यात यश मिळवले आहे. हा कॉल वेल्समधील दुर्गम पर्वतीय प्रदेशातून करण्यात आला, जिथे पूर्वी मोबाइल नेटवर्क उपलब्ध नव्हते. हे उपग्रह तंत्रज्ञान या वर्षाच्या अखेरीस किंवा वर्ष 2026 मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते.
युरोपियन मोबाइल ऑपरेटरच्या सीआयओ मार्गारीटा यांना हा कॉल आला होता, जो कंपनीचे अभियंता रोवन यांनी केला होता. या तंत्रज्ञानामुळे, ज्या भागांमध्ये मोबाइल नेटवर्क उपलब्ध नाही, तेथील वापरकर्तेही व्हिडिओ कॉल, इंटरनेट आणि ऑनलाइन मेसेजिंग सेवा वापरू शकतील. हे तंत्रज्ञान पूर्ण मोबाइल ब्रॉडबँड अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे आणि त्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटीमध्ये मोठी क्रांती घडेल.
रिपोर्टनुसार, सॅटेलाइट मोबाइल व्हिडिओ कॉल करण्यासाठी वापरलेले हँडसेट Google Pixel 9 Pro डिव्हाइस होते. व्होडाफोनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मार्गारिटा डेला व्हॅले यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. या तंत्रज्ञानामुळे भविष्यातील मोबाइल कनेक्टिव्हिटीमध्ये मोठे बदल घडतील, असे त्यांनी सांगितले. (हेही वाचा: New Recharge Plan 2025: Airtel, Jio आणि Vi चे नवे व्हॉइस आणि एसएमएस पॅक लाँच, कोणत्या कंपनीचा प्लॅन चांगला आहे? पहा)
या ऐतिहासिक उपग्रह व्हिडिओ कॉलबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, खालील व्हिडिओ पाहू शकता:
दरम्यान, व्होडाफोनने AST स्पेसमोबाइल या कंपनीसोबत दीर्घकालीन करार केला आहे, ज्यामुळे युरोप आणि आफ्रिकेमध्ये उपग्रहाद्वारे सेल्युलर ब्रॉडबँड सेवा पुरवता येईल. या तंत्रज्ञानासाठी, व्होडाफोन लॉ-अर्थ ऑरबिटमधील AST SpaceMobile च्या 5 ब्लूबर्ड उपग्रहांची मदत घेत आहे. त्याच्या मदतीने, कंपनी सामान्य स्मार्टफोनवर 120Mbps ट्रान्समिशन सेवा देत आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्या वापरकर्त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. व्होडाफोनने सप्टेंबर 2023 मध्ये मानक फोन वापरून जगातील पहिला स्पेस-आधारित 5G कॉल करण्याचा दावाही केला आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

