GT vs MI: इंडियन प्रीमियर लीग 2023 चा (IPL 2023) दुसरा क्वालिफायर आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स (GT vs MI) यांच्यात खेळला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Ahmedabad's Narendra Modi Stadium) स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघांना अंतिम फेरी गाठण्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे. बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या सामन्यात कृणाल पांड्याच्या संघाला 81 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला. तर पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा पराभव केला. आता दुसरा क्वालिफायर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे.
हेड टू हेड
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्सने 1 सामना तर मुंबई इंडियन्सने 2 वेळा विजय मिळवला आहे. अर्थात हेड टू हेड रेकॉर्ड मुंबई इंडियन्ससाठी चांगले आहे पण गुजरात टायटन्स त्यांच्या घरच्या मैदानावर खूप धोकादायक असेल. गेल्या वर्षी याच मैदानावर गुजरात टायटन्सने आयपीएल फायनल जिंकली होती. (हे देखील वाचा: GT vs MI IPL 2023 Qualifier 2 Live Streaming Online: गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहणार सामना?)
आजच्या सामन्यात होऊ शकतात हे मोठे विक्रम :
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवला आयपीएलमध्ये 350 चौकारांचा टप्पा गाठण्यासाठी आठ चौकारांची गरज आहे.
मुंबई इंडियन्सचा सलामीवीर इशान किशन आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्ससाठी 100 षटकार पूर्ण करण्यापासून दहा षटकार दूर आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमध्ये 100 झेल पूर्ण करण्यासाठी दोन झेल आवश्यक आहेत.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला कर्णधार म्हणून 4000 धावा पूर्ण करण्यासाठी 22 धावांची गरज आहे.
गुजरात टायटन्सचा स्टार अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला आयपीएलमध्ये 50 षटकार पूर्ण करण्यासाठी सात षटकारांची गरज आहे.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला गुजरात टायटन्ससाठी 50 बळी पूर्ण करण्यासाठी चार विकेट्सची गरज आहे.
आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा अनुभवी गोलंदाज रशीद खानला गुजरात टायटन्ससाठी 50 बळी पूर्ण करण्यासाठी सहा विकेट्सची गरज आहे.
अल्झारी जोसेफला टी-20 क्रिकेटमध्ये 100 धावा पूर्ण करण्यासाठी एका विकेटची गरज आहे.
पीयूष चावलाला टी-20 क्रिकेटमध्ये 300 बळींचा टप्पा गाठण्यासाठी तीन विकेट्सची गरज आहे.
सूर्यकुमार यादवला टी-20 क्रिकेटमध्ये 6500 धावांचा टप्पा पूर्ण करण्यासाठी 58 धावांची गरज आहे.
हार्दिक पांड्याला टी-20 क्रिकेटमध्ये 150 बळींचा टप्पा गाठण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे.
टी-20 क्रिकेटमध्ये 350 चौकार पूर्ण करण्यासाठी शुभमन गिलला सहा चौकारांची गरज आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर:
गुजरात टायटन्स : शुभमन गिल, ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), दासून शनाका, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, दर्शन नळकांडे, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, सूर्यकुमार यादव, टीम डेव्हिड, नेहल वढेरा, विष्णू विनोद, ख्रिस जॉर्डन, पीयूष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल.