Australia Men's Cricket Team vs Indian National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया मेन्स क्रिकेट संघ (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील (Border-Gavaskar Trophy 2024-25) पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवला जात आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. सिडनी कसोटीत रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. दिवसाअखेर भारताने दुसऱ्या डावात सहा विकेट गमावून 141 धावा केल्या आहे. यासह भारताने 145 धावांची आघाडी घेतली आहे. रवींद्र जडेजा (8) तर सुंदर (6) धावांंवर नाबाद आहे.
A cracking day of Test cricket ✨
Which team would be more confident heading into day 3 at the SCG? https://t.co/62ZjPEw7RL #AUSvIND pic.twitter.com/WFaCnrdcj8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 4, 2025
येथे वाचा संपूर्ण स्कोरकार्ड
भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट
प्रथम फलंदाजी करताना भारताची वाईट सुरुवात झाली. भारताचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल स्वस्तात बाद झाले. त्यानंतर पुनरागमन करणारा शुभमन गिल (20) धावा करुन बाद झाला. विराट कोहली थोडा वेळ लयीत दिसला पण शेवटी ऑफ स्टॅम्पच्या बाॅलचा बळी ठरला. त्यानंतर पंत आणि जडेजाने संघाची हाती कमान घेतली. त्यांनी थोडा वेळ घेत स्कोरबोर्ड चालू ठेवला. पण मोठ्या शाॅट मारण्याच्या नादात पंत त्याची मोठी विकेट देवुन बसला. त्यानंतर सगळ्यांनी विकेट फेकल्या आणि भारत पहिल्या डावात 185 ऑलआऊट झाला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना स्कॉट बोलंड आणि मिचेस स्टार्कने कहर केला आहे. स्टार्कने (3) आणि बोलंड (4) विकेट घेतल्या. तर कॅमिन्सला 2 आणि लायनला 1 विकेट मिळाली.
हे देखील वाचा: Jasprit Bumrah Milestone: सिडनी कसोटीत बुमराहने रचला नवा इतिहास, परदेशात अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघ 181 धावांवर आटोपला
ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्याच दिवशी डावाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने उस्मान ख्वाजाला बाद केले. आज दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची वाईट सुरुवात झाली. मार्नस लॅबुशेनला (2) आणि कॉन्स्टास (23) धावा करुन बाद झाला. ऑस्ट्रेलियाने 39 धावांवर 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कोणताही कांगारु फलंदाज जास्तवेळ टीकू शकला नाही. वेबस्टरच्या 57 धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलिया पहिल्या डावात 181 करू शकला. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णाने प्रत्येकी (3-3) विकेट घेतल्या. तर बुमराह आणि नितीन रेड्डीने प्रत्येकी (2-2) विकेट घेतल्या.
ऋषभ पंतने कांगारुना झोडपले
दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली, टीम इंडियाला पहिला धक्का 42 धावांवर बसला. 13 च्या वैयक्तिक स्कोअरवर केएल राहुलला स्कॉट बोलंडने क्लीन बोल्ड केले. यानंतर यशस्वी जैस्वाल (22) यालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. विराट कोहलीला (6) धावा करुन बाद झाला. शुभमन गिल (13) बाद केले. दुसऱ्या डावात 4 विकेट पडल्यानंतर ऋषभ पंतने कांगारुना झोडपले, त्याने 29 चेंडूत अर्धशतक झळकावले. पॅट कमिन्सने ऋषभ पंतच्या वादळी खेळीला पूर्णविराम दिला, तो 33 चेंडूत (61) धावांवर झेलबाद झाला. नितीश रेड्डी यांच्या रूपाने भारताला सहावा धक्का बसला. ऑस्ट्रेलियाकडून बोलंड (4) तर कमिन्स आणि वेबस्टर प्रत्येकी (1-1) विकेट घेतली. आता तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचे लक्ष ऑस्ट्रेलियाला मोठ्या धावांचे लक्ष देण्यावर असेल.