
Team India Super-8 Matches: टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2024) फेरी-1 मध्ये सलग तीन विजय नोंदवल्यानंतर भारतीय संघ (Team India) दुसऱ्या फेरीत म्हणजेच सुपर-8 मध्ये पोहोचला आहे. या मोसमात सुपर-8 मध्ये पोहोचणारा हा संघ दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियानंतरचा तिसरा संघ ठरला आहे. भारताने गटातील तिसऱ्या सामन्यात अमेरिकेचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. आता भारताची खरी परीक्षा होणार आहे. कारण सुपर-8 मधील पराभवामुळे भारताचा स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका वाढेल. अशा परिस्थितीत, या फेरीत भारताचा सामना कोणत्या 3 संघांशी होणार आहे ते जाणून घेऊया. (हे देखील वाचा: IND vs USA यांच्यातील सामन्यात Mohammad Siraj ठरला 'सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक', माजी अनुभवी अष्टपैलू Yuvraj Singh ने दिले पदक)
ऑस्ट्रेलियाशी होणार टक्कर
टीम इंडिया सुपर-8 मध्ये पोहोचताच ऑस्ट्रेलियाशीही सामना होणार हे निश्चित झाले आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत गट-1 मध्ये असणार आहेत. या दोन्ही संघांमधील हा सामना 24 जून रोजी डॅरेन सॅमी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. या मोठ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. विशेषत: गेल्या दोन आयसीसी स्पर्धांबद्दल बोलायचे झाल्यास, ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे ज्याने भारताकडून ट्रॉफी हिसकावून घेतली. अशा स्थितीत यावेळी भारताला ऑस्ट्रेलियाला हरवून उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. मात्र, हा भारताचा शेवटचा सुपर-8 चा शेवटचा सामना असेल. याआधी आणखी दोन सामने खेळायचे आहेत.
भारतीय संघाची सुपर-8 मधील संभाव्य वेळापत्रक
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान बारर्बाडोस रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
22 जून – भारत विरुद्ध बांग्लादेश किंवा नेंदरलँड रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रलिया सेंट लूसिया रात्री 8 वाजता (भारतीय वेळेनूसार)
या दोन संघासोबत होवू शकते लढत
वास्तविक, भारत-ऑस्ट्रेलिया गट-अ मध्ये असून या गटात आणखी दोन संघ येतील. गट-ड मधील द्वितीय क्रमांकाचा संघ आणि गट-क मधील प्रथम क्रमांकाचा संघ. भारताचा सुपर-8 मध्ये या दोन संघांशी सामना होणार आहे. अशा स्थितीत पॉइंट टेबलवर नजर टाकली तर भारताचा सामना गटात अव्वल स्थान मिळवण्याच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तानशी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ड गटात दुसऱ्या स्थानासाठी बांगलादेश, नेदरलँड आणि नेपाळ यांच्यात लढत आहे. आगामी सामन्यांमध्ये भारत सुपर-8 चे पहिले दोन सामने कोणाविरुद्ध खेळणार हे चित्र स्पष्ट होणार आहे.