Photo Credit - Twitter

गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या लाजीरवाण्या पराभवानंतर झिम्बाब्वेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्विटरवर पाकिस्तानला जबरदस्त ट्रोल केले. झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष इमर्सन नंगाग्वा (Emmerson Mnangagwa) यांनी ट्विटरवर लिहिले, “झिम्बाब्वेसाठी विजय आहे! संघाचे अभिनंदन. पुढच्या वेळी खरा मिस्टर बीन पाठवा.” आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी त्यांच्या ट्विटला उत्तर दिले आहे. आमच्याकडे खरा मिस्टर बीन नसेल, पण आमच्यात खरा क्रिकेट स्पिरिट आहे... आणि आम्हा पाकिस्तानी लोकांना पुनरागमन करण्याची विचित्र सवय आहे. अध्यक्ष महोदयांचे अभिनंदन. तुमचा संघ आज खूप छान खेळला.

काय आहे मिस्टर बीन संपूर्ण प्रकरण ?

सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) सराव सत्राची फोटो शेअर केली. झिम्बाब्वेचा वापरकर्ता Ngugi Chasura या पोस्टवर टिप्पणी केली. त्यांनी लिहिले की, झिम्बाब्वेचा नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. एकदा तुम्ही खऱ्या मिस्टर बीन ऐवजी बनावट पाकिस्तानी बीन दाखवले होते. उद्या मैदानावर या प्रकरणाची चौकशी करू. उद्याचा पाऊस तुम्हाला वाचवो हीच प्रार्थना. (हे देखील वाचा: T20 World Cup 2022: झिम्बाब्वेने पाकिस्तानला 1 धावेने पराभूत केल्यानंतर Pak Bean Avenged मीम्स व्हायरल; बनावट मिस्टर बीनमुळे सोशल मिडियावर युद्ध स्थिती)

काय घडलं मॅचमध्ये?

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने पाकिस्तानसमोर 131 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ आठ गडी गमावून केवळ 129 धावाच करू शकला आणि एका धावेने सामना गमावला.