पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर झिम्बाब्वेने ICC T20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानला एका धावेने हरवल्यानंतर, 'पाक बीन अॅव्हेंज्ड' चे मजेदार मीम्स ट्रेंड होऊ लागले आहेत. विजयासाठी 131 धावांचे तुटपुंजे आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही व त्यांच्याकडून 20 षटकांत 8 बाद 129 धावाच होऊ शकल्या. मात्र सोशल मिडियावर Pak Bean Avenged ची चर्चा आहे.

तर याआधी पीसीबीने ट्विटरवर काही छायाचित्रे पोस्ट केली होती, ज्यात पाकिस्तान संघ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यापूर्वी सराव करताना दिसत आहे. या फोटोवर कमेंट करताना झिम्बाब्वेच्या एका क्रिकेट चाहत्याने लिहिले की, 'आमच्या देशाचे नागरिक म्हणून आम्ही तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्ही एकदा खऱ्या ऐवजी बनावट पाकिस्तानी मिस्टर बीन दाखवला होता. हा वाद आपण मैदानावर पाहू,'

2016 मध्ये हरारे कृषी कार्यक्रमादरम्यान पाकिस्तानने बनावट मिस्टर बीन बनवून एका कलाकाराला झिम्बाब्वेला पाठवले होते. या व्यक्तीचे नाव असीम मोहम्मद असे होते, जो मिस्टर बीनसारखा दिसत होता. आता झिम्बाब्वेने पाकिस्तानच्या हरवल्यानंतर, पाकिस्तानच्या 6 वर्षांपूर्वीच्या कृत्याचा बदला घेतला गेला असे झिम्बाब्वेच्या क्रिकेट प्रेमींचे मत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)