देशात कोरोनाचे (Corona) रुग्ण सातत्याने वाढत आहेत. रविवारी दीड लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली. अशा परिस्थितीत आयपीएल 2022 (IPL-2022) च्या आयोजनाबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्यावर्षी कोरेनामुळे ही स्पर्धा थांबवावी लागली होती. यानंतर दुसऱ्या टप्प्यात यूएईमध्ये (UAE) खेळण्यात आली. (IPL 2020) चा संपूर्ण हंगाम (UAE) मध्ये झाला. अशा परिस्थितीत चालू हंगामात देशात टी-20 (T-20) लीग आयोजित करणे बीसीसीआयसाठी (BCCI) सोपे जाणार नाही. यावेळी लीगमध्ये 8 ऐवजी 10 संघ उतरले आहेत. म्हणजेच खेळाडूंची संख्या जशी वाढेल तसेच सामन्यांची संख्याही वाढेल.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, बीसीसीआय या कार्यक्रमासाठी घराबाहेरील पर्याय म्हणून परदेशी स्थळांकडे लक्ष देत आहे. “आम्ही सर्व पर्यायांचा शोध घेत आहोत,” असे सूत्राने सांगितले. यामध्ये देशाबाहेरील ठिकाणांचाही समावेश आहे. पण आमचे लक्ष निश्चितपणे भारतात आयपीएल आयोजित करण्यावर आहे. सध्या आमचे प्राधान्य लिलावाला आहे. आम्ही लवकरच निर्णय घेऊ.' यापूर्वी, बोर्डाने कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे रणजी ट्रॉफीसह तीन देशांतर्गत स्पर्धांचे आयोजन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलले आहे. (हे ही वाचा IPL 2022 Auction: ‘या’ 5 धाकड खेळाडूंवर असणार मुंबई इंडियन्सची नजर, मेगा लिलावात लावू शकतात मोठी बोली)
भारतातच आयपीएलचे आयोजन करावे - सौरव गांगुली
बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी नुकतेच सांगितले होते की, आम्हाला आयपीएलचे आयोजन घरच्या मैदानातच करायचे आहे. मात्र कोरोनाच्या प्रकरणामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडिजलाही खेळण्यासाठी भारतात यावे लागणार आहे. यानंतर श्रीलंकेचा संघही भारतात येणार आहे. T20 लीगचा मेगा लिलावही पुढील महिन्यात होणार आहे. मात्र याबाबत बोर्डाकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.