Team India (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात 6 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात टीम इंडियाचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) खेळत नव्हते. त्याचवेळी संघाची कमान हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) होती. या सामन्यात संघाचे सर्व युवा खेळाडू पूर्णपणे फ्लॉप ठरले. यानंतर पुन्हा एकदा संघ व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या रिपोर्टमध्ये आम्ही बोलत आहोत ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) यांच्याबद्दल. या दौऱ्यात गायकवाड पुर्णपणे बाकावर बसून राहिला.

पहिल्या संधीची पाहत आहे वाट 

पहिल्या दोन सामन्यांची कसोटी मालिका आणि आता तीन वनडे सामने गायकवाड अजूनही या मालिकेत पहिल्या संधीची वाट पाहत आहेत. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात विराट आणि रोहित संघात पुनरागमन करतील, अशी अपेक्षा आहे. अशा स्थितीत गायकवाडला तिसऱ्या वनडेत संधी मिळण्याची शक्यता फारच कमी आहे. (हे देखील वाचा: Rahul Dravid On Surya Kumar Yadav: सूर्यकुमार यादवच्या बचावाला आले प्रशिक्षक राहुल द्रविड, म्हणाले- 'तो अजूनही शिकतोय एकदिवसीय क्रिकेट')

आयपीएलमध्ये केली चांगली कामगिरी

आयपीएल 2023 मध्ये गायकवाडची कामगिरीही उत्कृष्ट होती. या फलंदाजाने 16व्या हंगामात 590 धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याच्याकडे आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. गायकवाडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर त्याने 1 वनडे आणि 9 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने वनडेमध्ये 19 आणि टी-20 मध्ये 135 धावा केल्या आहेत.

काय घडलं मॅचमध्ये?

नाणेफेक हारल्यानंतर टीम इंडियाला शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी 90 धावांची सुरुवात केली. यानंतर संपूर्ण संघ 181 धावांत गारद झाला, म्हणजेच 91 धावांत 10 विकेट पडल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 36.4 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. या सामन्यात टीम इंडिया 40.5 षटकात अवघ्या 181 धावांवर गारद झाली.