टीम इंडिया (Photo Credit: PTI)

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखालील टीम इंडिया (Team India) पुढील मालिकेसाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया 25 जानेवारीपासून पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडशी भिडणार आहे. याआधी टीम इंडिया आजपासून हैदराबादमध्ये या महत्त्वाच्या कसोटी मालिकेसाठी सराव सुरू करणार आहे. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. ही मालिका जानेवारीपासून सुरू होऊन मार्चपर्यंत चालणार आहे. या मालिकेतील सर्व सामने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवले जातील, त्यामुळे हे सामने अधिक महत्त्वाचे आहेत. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये होणार आहे.

टीम इंडिया घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. टीम इंडियाचा इंग्लंडविरुद्धचा एकूण कसोटी रेकॉर्ड बघितला तर तो चांगला राहिला नाही. 131 कसोटी सामने खेळताना टीम इंडियाला केवळ 31 सामने जिंकता आले आहेत. (हे देखील वाचा: IND vs ENG Test Series 2024: भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात 'या' फलंदाजांनी ठोकली आहेत सर्वाधिक शतके, पाहा दिग्गज खेळाडूंची आकडेवारी)

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात आतापर्यंत एकूण 131 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने केवळ 31 सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडने 50 सामने जिंकले आहेत. आणि 50 सामने अनिर्णित राहिले. टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील शेवटचा कसोटी सामना जुलै 2022 मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियाला 7 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. याआधी टीम इंडियाने इंग्लंडचा 157 धावांनी पराभव केला होता. हा सामना सप्टेंबर 2021 मध्ये ओव्हल येथे खेळला गेला होता.

कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ असे आहेत

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.

इंग्लंड : बेन स्टोक्स (कर्णधार), रेहान अहमद, जेम्स अँडरसन, गुस ऍटकिन्सन, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रूक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फोक्स (विकेटकीपर), टॉम हार्टले, जॅक लीच, ऑली पोप, ऑली रॉबिन्सन, जो रूट आणि मार्क वुड.