आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) अंतिम फेरीसाठी पात्र होण्याच्या शर्यतीला रविवारी, 19 फेब्रुवारी 2023 रोजी एक नवीन वळण मिळाले, जेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अरुण जेटली येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला. यासह, भारतीय क्रिकेट संघ 7 जून रोजी इंग्लंडमधील ओव्हल येथे होणार्या अंतिम सामन्यासाठी स्थान मिळवण्याच्या जवळ पोहोचला आहे. दोन वर्षांपासून प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) साठी तीव्र स्पर्धा सुरू आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीत तिसऱ्या दिवशी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने विजय मिळवला. आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, डब्ल्यूटीसीमधील अव्वल दोन संघ जूनमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतील. या विधानाचा अर्थ असा आहे की ऑस्ट्रेलिया आणि भारत अंतिम फेरीच्या शर्यतीत अजूनही आघाडीवर आहेत.
पराभवानंतरही ऑस्ट्रेलिया 66.67 टक्क्यांसह गुणतालिकेत अव्वल आहे, तर भारताने दिल्ली कसोटीत विजय मिळवून स्वत: आणि तिसऱ्या क्रमांकावरील संघ यांच्यातील अंतर वाढवले आहे. आता टीम इंडियाची टक्केवारी 64.06 टक्के झाली आहे. (हे देखील वाचा: IND vs AUS 3rd Test: अश्विन-जडेजाची जोडी तिसऱ्या कसोटीत कुंबळे-हरभजनचा मोडू शकते विक्रम, फक्त करावे लागेल हे काम)
दिल्लीतील दुसऱ्या कसोटीच्या निकालामुळे अंतिम फेरीच्या शर्यतीतील संघ चारवरून तीनवर कमी झाले आहेत कारण दक्षिण आफ्रिका शर्यतीतून बाहेर पडला आहे. अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांना आवश्यक टक्केवारी गुण कमी पडले. याला आव्हान देणारा एकमेव संघ श्रीलंका आहे. श्रीलंकेला 53.33% गुण आहेत. श्रीलंकेला पुढील महिन्यात न्यूझीलंडमध्ये दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. श्रीलंकेला पात्र ठरायचे असेल तर त्यांना दोन्ही सामने जिंकावे लागतील.
फायनलमध्ये पोहोचण्याचे भारताचे काय आहे गणित
फायनलसाठी पात्र होण्यासाठी भारताला आता उर्वरित दोनपैकी किमान एक कसोटी जिंकणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 ने मालिका जिंकल्यास भारताची विजयाची टक्केवारी 61.92 वर जाईल. हे श्रीलंकेच्या सर्वोत्तम संभाव्य निकालापेक्षा (61.11) जास्त असेल. या स्थितीत ऑस्ट्रेलियाही अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. भारताने मालिकेतील उर्वरित दोन्ही कसोटी गमावल्यास मालिका 2-2 अशी बरोबरीत राहील. अशा स्थितीत त्याची विजयाची टक्केवारी 56.94 पर्यंत खाली येईल. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत श्रीलंकेचे गुण कमी झाले तरी भारत पात्र ठरेल.
जर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाचा 3-0 किंवा 4-0 अशा फरकाने पराभव केला तर ते वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचू शकते. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात दुसऱ्या स्थानासाठी स्पर्धा सुरू होईल. दरम्यान, ऑस्ट्रेलिया पुढील दोन कसोटी सामने अनिर्णित राखण्यात किंवा जिंकण्यात अपयशी ठरल्यास, श्रीलंकेला (53.33) अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्याची संधी उपलब्ध होईल, जर त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध आगामी मालिका 2-0 ने जिंकली तर ते फायनल पात्र होवु शकतात.