MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape (Photo Credit - X)

MI Cape Town vs Sunrisers Eastern Cape SA20 Final: दक्षिण आफ्रिकेची टी-20 लीग SA20 आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. लीगचा विजेता आज मिळाले. या लीगचा अंतिम सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना एमआय केपटाऊन विरुद्ध सनरायझर्स ईस्टर्न केप यांच्यात होईल. दोन्ही संघांमधील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 9 वाजता जोहान्सबर्गमधील द वँडरर्स स्टेडियमवर खेळला जाईल. सनरायझर्स संघ दोन्ही वेळा SA20 चा चॅम्पियन बनला आहे आणि आता पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. एमआय केपटाऊनलाही पहिल्यांदाच ट्रॉफी उचलायची आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघांमध्ये कठीण स्पर्धा दिसून येते. या स्पर्धेत सनरायझर्स ईस्टर्न केपची कमान एडेन मार्करामकडे आहे. तर, एमआय केपटाऊनचे नेतृत्व रशीद खानकडे आहे.

हेड टू हेड रेकाॅर्ड

SA20 लीगच्या इतिहासात, सनरायझर्स ईस्टर्न केप आणि MI केपटाऊन यांच्यात एकूण 6 सामने खेळले गेले आहेत. या काळात, सनरायझर्स ईस्टर्न केपने चार सामने जिंकले आहेत. तर, एमआय केपटाऊनने दोनदा विजय मिळवला आहे. चालू हंगामाबद्दल बोलायचे झाले तर, दोन्ही वेळा एमआय केपटाऊन संघाने सनरायझर्स ईस्टर्न केपवर मोठा विजय मिळवला आहे. (हे देखील वाचा: Pakistan vs New Zealand, 1st ODI Match Scorecard: लाहोर एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर ठेवले 331 धावांचे लक्ष्य, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेलची शानदार खेळी)

 

कुठे पाहणार लाइव्ह सामना?

सनरायझर्स ईस्टर्न केप विरुद्ध एमआय केपटाऊन यांच्यातील अंतिम सामना भारतातील स्टार स्पोर्ट्स 2 आणि स्टार स्पोर्ट्स 2 एचडी टीव्ही चॅनेलवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग डिस्ने + हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स ईस्टर्न केप (प्लेइंग इलेव्हन): टोनी डी झोर्झी, डेव्हिड बेडिंगहॅम, जॉर्डन हर्मन, एडन मार्कराम (कर्णधार), टॉम अबेल, ट्रिस्टन स्टब्स (विकेटकीपर), मार्को जॅन्सन, क्रेग ओव्हरटन, लियाम डॉसन, रिचर्ड ग्लीसन, अँडिले सिमलेन

एमआय केप टाउन (प्लेइंग इलेव्हन): रायन रिकेलटन (विकेटकीपर), रॅसी व्हॅन डर ड्यूसेन, रीझा हेंड्रिक्स, डेवाल्ड ब्रेव्हिस, कॉनर एस्टरहुइझेन, जॉर्ज लिंडे, डेलानो पॉटगीटर, कॉर्बिन बॉश, रशीद खान (कर्णधार), कागिसो रबाडा, ट्रेंट बोल्ट