Kieron Pollard (PC - Twitter)

IPL 2021, MI vs CSK: दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर शनिवारी चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2021 चा 27 वा सामना खेळला गेला. 20 व्या षटकातील अखेरच्या चेंडूवर 6 गडी गमावून मुंबईने 219 धावांचे विशाल लक्ष्य गाठले. मुंबईकडून किरोन पोलार्ड (Kieron Pollard) ने सर्वाधिक 34 धावा केल्या. त्याने 17 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पोलार्डने 34 चेंडूत 87 धावांची जोरदार खेळी करताना 8 षटकार आणि 6 चौकार ठोकले. या खेळीच्या जोरावर त्याने सामना बदलला. पोलार्डशिवाय क्विंटन डी कॉकने 38 आणि रोहित शर्माने 35 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक तीन बळी घेतले.

किरोन पोलार्ड याच्या मैदानावरील शौर्यानंतर त्याचे ड्रेसिंग रूममध्ये परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. यावेळी किरोनच्या सहकार्यांनी त्याला मिठी मारली. तसेच यावेळी किरोन पोलार्ड विरोधकांना प्रतिउत्तर देताना म्हणाला की, अशा प्रकारच्या लोकांबद्दल लिखाण करणं थांबवा. जे आधी केलं तसचं करत रहा. कोण काय बोललं तरी हरकत नाही.' (वाचा - MI vs CSK IPL 2021 Match 27: किरोन पोलार्डचे वेगवान अर्धशतक, चेन्नईच्या विजयी ‘एक्सप्रेस’वर लागला ब्रेक; मुंबई इंडियन्सने मिळवला दिमाखदार विजय)

मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून किरोन पोलार्डचा ड्रेसिंग रुममधील स्वागताचा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसेच नेटीझन्सकजून पोलार्डच्या खेळीचं कौतुक होत आहे.

मुंबईसाठी किरोन पोलार्डने सर्वाधिक नाबाद 87 धावा केल्या. चेन्नईकडून सॅम करणने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 4 गडी गमावत 218 धावा केल्या. चेन्नईकडून अंबाती रायुडूने नाबाद 72 धावा केल्या. मुंबईकडून कीरोन पोलार्डने दोन विकेट घेतल्या.