Team-India-U19, Photo Credit - Twitter

अंडर-19 महिला टी-20 विश्वचषकात (U19 Women’s T20 WC 2023) टीम इंडियाने (Team India) उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. टीम इंडियाने सुपर सिक्समध्ये करो किंवा मरोचा सामना जिंकून उपांत्य फेरीत स्थान पक्के केले. शेफाली वर्माच्या (Shefali Verma) नेतृत्वाखालील 19 वर्षांखालील भारतीय महिला क्रिकेट संघ टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी (IND vs NZ) भिडणार आहे. यापूर्वी टीम इंडियाला सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध (AUS) पराभव पत्करावा लागला होता. टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यातील हा सामना उद्या म्हणजेच 27 जानेवारी रोजी दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे खेळवला जाणार आहे. या उपांत्य फेरीच्या सामन्यात जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

या विश्वचषकात न्यूझीलंडचा महिला संघ आतापर्यंत अजिंक्य ठरला आहे. न्यूझीलंडने ग्रुप मॅचपासून सुपर सिक्सपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. न्यूझीलंडने ग्रुप मॅचमध्ये इंडोनेशिया, आयर्लंड आणि वेस्ट इंडिजच्या महिला संघांचा पराभव केला, तर न्यूझीलंडने रवांडा आणि पाकिस्तानचा सुपर सिक्समध्ये पराभव केला. अशाप्रकारे न्यूझीलंड संघाने अंडर-19 टी-20 महिला विश्वचषकात चांगली कामगिरी केली. अशा स्थितीत न्यूझीलंड संघासमोर उपांत्य फेरीतील टीम इंडियाचा मार्ग सोपा नसेल. (हे देखील वाचा: IND vs NZ T20 Head To Head: वनडे मालिकेनंतर टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात होणार टी-20 लढाई; कोण आहे वरचढ, पहा आकडेवारी)

टीम इंडियाची कामगिरी 

या अंडर-19 महिला T20 विश्वचषक 2023 मध्ये टीम इंडियाची कामगिरीही उत्कृष्ट राहिली आहे. टीम इंडिया ग्रुप-डीमध्ये होती. यादरम्यान टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका, संयुक्त अरब अमिराती आणि स्कॉटलंडचा पराभव केला. यानंतर टीम इंडियाला सुपर सिक्सच्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले होते. पण दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने दमदार पुनरागमन करत श्रीलंकेचा पराभव करत उपांत्य फेरीतील आपले स्थान पक्के केले.