IND vs AFG T20 Series 2024: टी-20 विश्वचषक 2024 पूर्वी टीम इंडियाची शेवटची सराव परिक्षा, तयारीसाठी फक्त तीन सामने बाकी
Team India (Photo Credit - Twitter)

IND vs AFG T20: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 11 जानेवारीपासून मोहालीत होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) 14 महिन्यांनंतर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांच्या नजरा या मालिकेकडे लागल्या आहेत. या वर्षी खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची ही शेवटची टी-20 मालिका आहे. यानंतर भारतीय संघ थेट विश्वचषकात खेळताना दिसणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडिया आणि भारतीय व्यवस्थापनासाठी ही मालिका खूप खास आहे. या मालिकेत संघ व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असेल.

विश्वचषकापूर्वी फक्त तीन सामने

टीम इंडियाला आता टी-20 वर्ल्ड कप 2024 पूर्वी फक्त तीन सामन्यांसाठी वेळ मिळणार आहे. या मालिकेत असे काही खेळाडू आहेत जे दुखापतीमुळे टीम इंडियाच्या संघाबाहेर आहेत, मात्र वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसू शकतात. सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या हे त्यातले मोठे नाव. या मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जाणार आहेत. अशा स्थितीत टीम इंडियाचे विश्वचषकापूर्वी केवळ तीन सामने शिल्लक आहेत. यानंतर भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कपमध्ये थेट टी-20 सामने खेळणार आहे. यंदाचा टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे.

भारतीय खेळाडूंना मिळेल संधी 

भारतीय संघ विश्वचषकापूर्वी शेवटची टी-20 मालिका खेळत असला तरी टीम इंडियाच्या खेळाडूंना तयारीची पूर्ण संधी मिळणार आहे. खरे तर आयपीएलचे आयोजन वर्ल्ड कपच्या आधी होणार आहे. जिथे टीम इंडियाचे खेळाडू जोमाने सराव करू शकतात. त्याचबरोबर विश्वचषकापूर्वी खेळाडूंच्या तयारीवरही निवडकर्ते लक्ष ठेवू शकतात. (हे देखील वाचा: IND vs AFG 1St T20 Live Streaming Online: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिला टी-20 सामन्याला आजपासुन सुरुवात, कधी अन् कुठे पाहणार लाइव्ह?)

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप यादव. , आवेश खान, मुकेश कुमार.