IND vs AFG (Photo Credit - Twitter)

IND vs AFG 1St T20: अफगाणिस्तानचा संघ टी-20 मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आला आहे. या मालिकेतील पहिला सामना मोहालीच्या (Mohali) IS बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही देशांमधील ही पहिली द्विपक्षीय टी-20 मालिका (IND vs AFG T20 Series 2024) असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यात भारताचा अद्याप पराभव झालेला नाही. रोहित शर्माचा (Rohit Sharma) संघ मोठा दावेदार आहे पण अफगाणिस्तानकडे अपसेट करण्याची क्षमता आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG T20 Series 2024: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 'हे' 6 खेळाडू पहिल्यांदाच खेळणार टी-20 सामना, करणार मोठी कामगिरी)

पहिला टी-20 कधी सुरू होईल?

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना गुरुवारी, 11 जानेवारी रोजी होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. नाणेफेक सामना सुरू होण्याच्या अर्धा तास आधी म्हणजेच 6.30 वाजता होईल. सलामीवीर इब्राहिम झद्रानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तानचा संघ या मालिकेत मैदानात उतरणार आहे.

कुठे पाहणार लाईव्ह?

प्रत्येक मालिका सुरू होण्यापूर्वी प्रत्येकाच्या मनात प्रश्न असतो की थेट सामना पाहायचा कुठे? आम्ही तुम्हाला उत्तर सांगतो. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या सामन्याचे स्पोर्ट्स 18 वाहिनीवर थेट प्रक्षेपण होणार आहे. यासोबतच हा सामना जिओ सिनेमा अॅपवर स्ट्रीम केला जाईल. चाहते अॅपवर विनामूल्य सामन्यांचा आनंद घेऊ शकतात. स्पोर्ट्स 18 कडे भारतात होणाऱ्या सर्व द्विपक्षीय मालिकांचे प्रसारण अधिकार आहेत.

पाहा दोन्ही संघाचे खेळाडू 

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, टिळक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, आवेश खान, मुकेश कुमार.

अफगाणिस्तान : इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), इकराम अलीखिल (विकेटकीपर), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब-उर रहमान, फजलहक फारुकी, फरीद अहमद, नवीन-उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब आणि रशीद खान.