
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना 09 मार्च (रविवार) रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवण्यात आला. भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडला हरवून जेतेपद पटकावले. भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वात यशस्वी क्रिकेट संघांपैकी एक आहे. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकून भारताने 11 वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला आणि आता 2025 चा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून आपले वर्चस्व पुन्हा स्थापित केले आहे. भारताच्या आतापर्यंतच्या आयसीसी जेतेपदाच्या प्रवासावर एक नजर टाकूया. हेही वाचा: Why Team India Wearing White Jackets: चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाचा आणि पांढऱ्या जॅकेटचा नेमका संबंध काय? टीम इंडियाला विशेष पोशाख का घालायला लावला जातो?
भारताच्या आयसीसी जेतेपदांची यादी
1 | वनडे वर्ल्ड कप | वेस्ट इंडीज | 1983 |
2 | चॅम्पियन्स ट्रॉफी | श्रीलंका | 2002 |
3 | टी20 विश्वचषक | पाकिस्तान | 2007 |
4 | वनडे विश्वचषक | श्रीलंका | 2011 |
5 | चॅम्पियन्स ट्रॉफी | इंग्लंड | 2013 |
6 | टी20 विश्वचषक | दक्षिण अफ्रीका | 2024 |
7 | चॅम्पियन्स ट्रॉफी | न्यूझीलंड | 2025 |
1975 मध्ये झालेल्या पहिल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाने आपला प्रवास सुरू करणाऱ्या या संघाने कालांतराने अनेक मोठे स्पर्धा जिंकल्या आहेत आणि आपली छाप सोडली आहे.