IND vs ZIM T20 Series 2024: झिम्बाब्वे क्रिकेटने (Zimbabwe Cricket) 6 फेब्रुवारी रोजी भारतासोबत घरच्या मैदानावर टी-20 मालिका खेळण्याची घोषणा केली आहे. भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM T20 Series) यांच्यातील ही टी-20 मालिका टी-20 विश्वचषक 2024 (T20 World Cup 2024) नंतर खेळवली जाईल. मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी, भारतीय क्रिकेट नियंत्रण (BCCI) आणि झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने या मालिकेची घोषणा केली आहे. दोन्ही संघांमधील ही मालिका 6 जुलै 2024 पासून सुरू होणार आहे. भारतीय संघ ही मालिका फक्त झिम्बाब्वेमध्ये खेळणार आहे. झिम्बाब्वे क्रिकेटने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही मालिका आयोजित करण्याचा उद्देश द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे आणि दोन्ही क्रिकेट मंडळांमधील सहकार्याच्या भावनेला चालना देणे हा आहे.
भारत आणि झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे पूर्ण वेळापत्रक
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील ही टी-20 मालिका जुलै 2024 मध्ये खेळवली जाणार आहे. मात्र, या मालिकेत अजून बराच वेळ शिल्लक असल्याने दोन्ही संघांकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याआधी भारतीय संघ 2024 चा टी-20 विश्वचषक खेळणार आहे. जे जूनमध्ये सुरू होईल. या टी-20 मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर झाले आहे. या मालिकेतील सर्व सामने हरारे येथे होणार आहेत. (हे देखील वाचा: IND Beat SA: भारताने रोमहर्षक सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा केला पराभव, ICC U19 World Cup च्या अंतिम फेरीत मारली धडक)
पाहा वेळापत्रपक
पहिला सामना- 6 जुलै (हरारे)
दुसरा सामना- 7 जुलै (हरारे)
तिसरा सामना- 10 जुलै (हरारे)
चौथा सामना- 13 जुलै (हरारे)
पाचवा सामना- 14 जुलै (हरारे)
झिम्बाब्वे चौथ्यांदा टी-20 मालिकेचे करणार आयोजन
झिम्बाब्वे चौथ्यांदा भारताविरुद्ध टी-20 मालिकेचे यजमानपद भूषवणार आहे. याआधी झिम्बाब्वेने 2010, 2015 आणि 2016 मध्ये भारतीय संघाविरुद्ध टी-20 मालिकेचे आयोजन केले होते. आता चौथ्यांदा झिम्बाब्वे टी-20 मालिकेचे यजमानपदासाठी सज्ज झाला आहे.
दोन्ही संघ शेवटच्या वेळी कधी आले होते आमनेसामने ?
दोन्ही संघांमध्ये अनेक टी-20 सामने खेळले गेले असले तरी. पण यावेळी भारत आणि झिम्बाब्वे 2022 च्या टी-20 विश्वचषकात आमनेसामने आले. भारतीय संघाने हा सामना 71 धावांनी जिंकला. या सामन्यात भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने अप्रतिम खेळी केली. या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या बॅटमधून अवघ्या 25 चेंडूत 61 धावा झाल्या.