India Squad T20 World Cup 2024: वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, हार्दिक-शिवमला संधी, राहुलला झटका, जाणून घ्या संपूर्ण संघ

टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची (World Cup Squad) घोषणा करण्यात आली आहे.  रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वात भारतीय संघ (Team India) विश्वचषकात उतरणार आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट नियामक मंडळने टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियामध्ये काही नवीन खेळाडूंनाही स्थान मिळाले आहे. हार्दिक पांड्याकडे (Hardik pandya) उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर ऋषभ पंत (Rishbh Pant) आणि संजू सॅमसन (Sanju Samson) भारतीय संघाचे विकेटकीपर असतील. केएल राहुलला (KL Rahul) संघात स्थान मिळू शकलेले नाही. (हेही वाचा - Rohit Sharma Birthday: मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने केला साजरा (Watch Video))

एक जूनपासून टी20 विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. बीसीसीआयनं आज टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची घोषणा केली. रोहित शर्माकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माशिवाय यशस्वी जायस्वाल, विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव यांना टॉप ऑर्डरचे फलंदाज म्हणून संधी देण्यात आली आहे.

पाहा पोस्ट -

टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान