India Women National Cricket Team vs Pakistan Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup 2024 7th Match: आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 मध्ये आज भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातला सातवा सामना दुबईतील दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जात गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने पाकिस्तान महिला संघाचा 6 गडी राखुन पराभव केला आहे. आणि 202 आयसीसी महिला विश्वचषकात विजयची सुरुवात केली आहे. भारताला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव पत्कारावा लागला होता.
#TeamIndia are back to winning ways!
A 6-wicket win against Pakistan in Dubai 👏👏
📸: ICC
Scorecard ▶️ https://t.co/eqdkvWWhTP#T20WorldCup | #INDvPAK | #WomenInBlue pic.twitter.com/0ff8DOJkPM
— BCCI Women (@BCCIWomen) October 6, 2024
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्ताचा संघ 20 षटकात आठ विकेट गमावून 105 धावा करु शकला. पाकिस्तानचा संघ पहिल्याच षटकापासून डगडगला. भारतीय स्टार गोलंदाज रेणूका सिंगने पाहिल्याच षटकात विकेट घेत पाकिस्ताला धक्का दिला. त्यानंतर लागोपाठ पाकिस्तानने विकेट गमावल्या. भारताकडून अरुंधती रेड्डी 3 आणि श्रेंयका पाटीलने दोन विकेट घेतल्या. भारताला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 106 धावा करायच्या होत्या.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही आणि स्टार सलामीवीर स्मृती मानधना अवघ्या सात धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. यानंतर शफाली वर्मा आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी मिळून डाव सांभाळला. टीम इंडियाने अवघ्या 18.5 षटकांत चार विकेट गमावून लक्ष्य गाठले. टीम इंडियासाठी सलामीवीर शफाली वर्माने सर्वाधिक 32 धावांची खेळी खेळली. शफाली वर्माशिवाय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद 29 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार फातिमा सनाने सर्वाधिक दोन बळी घेतले. फातिमा सनाशिवाय सादिया इक्बाल आणि ओमामा सोहेलने प्रत्येकी एक विकेट घेतली. टीम इंडिया आता आपला पुढचा सामना श्रीलंकेविरुद्ध बुधवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी दुबईत संध्याकाळी 7.30 वाजता खेळणार आहे.