Team India (Photo Credit - Twitter)

सध्या टीम इंडिया (Team India) आशिया कप 2023 (Asia Cup 2023) मध्ये व्यस्त आहे. टीम इंडियाने आशिया चषकाच्या अंतिम फेरीत आपले स्थान पक्के केले असून 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळण्याची तयारीही सुरू झाली आहे. फायनलपूर्वी टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध (IND vs PAK) सुपर 4 चा शेवटचा सामनाही खेळायचा आहे. बेंचवर बसलेल्या काही खेळाडूंना या सामन्यात संधी मिळू शकते. दरम्यान, वर्ल्ड कप 2023 (ICC Cricket World Cup 2023) साठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिकाही खेळायची आहे. या मालिकेसाठी संघ अद्याप निश्चित झालेला नाही. यासाठी लवकरच टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते.

आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2023 पूर्वी टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 22 सप्टेंबरपासून तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. टीम इंडियासाठी वर्ल्डकपच्या तयारीसाठी ही शेवटची संधी असेल. आशिया चषकाचा अंतिम सामना 17 सप्टेंबरला होणार असून 22 सप्टेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. (हे देखील वाचा: Ravindra Jadeja Record: बांगलादेशविरुद्धच्या रोमांचक सामन्यात रवींद्र जडेजा करू शकतो हे खास विक्रम, पहा आकडे)

आशिया चषकासाठी जाहीर झालेला जवळपास तोच संघ विश्वचषकासाठीही निवडला गेला आहे. आशिया कपमध्ये सर्व खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. खेळाडूला विश्रांती दिली तरच बदल घडू शकतो. एकीकडे विश्वचषकाच्या तयारीसाठी ही मालिका आवश्यक असताना दुसरीकडे विश्वचषकापूर्वी या मालिकेत कोणताही खेळाडू दुखापतग्रस्त व्हावा, असे कोणत्याही संघाला वाटत नाही. बीसीसीआय संघ कधी जाहीर करणार आणि पूर्ण संघ काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा असा असु शकतो संघ रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.