India Women's National Cricket Team vs West Indies Women's Cricket Team: भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना रविवारी म्हणजेच 15 डिसेंबर रोजी खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना नवी मुंबईतील डॉ.डी.वाय.पाटील स्पोर्ट्स अकादमीत खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा 49 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर आहे. तर, वेस्ट इंडिजचे नेतृत्व हेली मॅथ्यू करत आहे. (हे देखील वाचा: MUM vs MP SMAT Final Live: सैयद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात मध्य प्रदेशचे मुंबई समोर 175 धावांचे आव्हान, रजत पाटीदारची 81 धावांची शानदार खेळी)

दरम्यान, पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात स्फोटक झाली आणि पहिल्या विकेटसाठी दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी अवघ्या 39 चेंडूत 50 धावा केल्या.

टीम इंडियाने निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 195 धावा केल्या. टीम इंडियासाठी जेमिमाह रॉड्रिग्जने सर्वाधिक 73 धावांची खेळी खेळली. या स्फोटक खेळीदरम्यान जेमिमाह रॉड्रिग्सने 35 चेंडूत नऊ चौकार आणि दोन षटकार ठोकले. जेमिमाह रॉड्रिग्जशिवाय स्मृती मानधनाने 54 धावा केल्या.

दुसरीकडे, करिश्मा रामहारिकने वेस्ट इंडिज संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. वेस्ट इंडिजकडून करिश्मा रामहारिकने सर्वाधिक दोन बळी घेतले. करिश्मा रामहारिकशिवाय डिआंड्रा डॉटिनने एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी वेस्ट इंडिज संघाला 20 षटकात 196 धावा करायच्या होत्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या दोन धावांवर संघाला पहिला मोठा धक्का बसला. वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 146 धावा करू शकली. वेस्ट इंडिजकडून डिआंड्रा डॉटिनने सर्वाधिक 52 धावांची खेळी खेळली. डिआंड्रा डॉटिनशिवाय कियाना जोसेफने 49 धावा केल्या.

तीत साधूने टीम इंडियाला पहिले मोठे यश मिळवून दिले. टीम इंडियासाठी तीतास साधूने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. तीतस साधूशिवाय दीप्ती शर्मा आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी म्हणजेच 17 डिसेंबर रोजी डॉ. डी.वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी, नवी मुंबई येथे सायंकाळी 7 वाजता होणार आहे.