IND vs PAK (Photo Credit - Twitter)

मुंबई: आशिया कप 2023 नंतर, टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) पुन्हा एकदा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये (ICC Cricket World Cup 2023) आमनेसामने आले. आज एकदिवसीय विश्वचषक 2023 चा 12 वा सामना टीम इंडिया आणि पाकिस्तान क्रिकेट टीममध्ये खेळला गेला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज दोन्ही देशांमधला हा शानदार सामना रंगला. या हाय व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा सात विकेट्सनी पराभव करत वर्ल्ड कपमध्ये सलग तिसरा विजय नोंदवला आहे. आतापर्यंत टीम इंडियाने विश्वचषकात आठव्यांदा पाकिस्तानला पराभूत केले आहे. आशिया चषकातील पराभवाचे दु:ख विसरून पाकिस्तान संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरला होता. पण, टीम इंडियाने पुन्हा एकदा पाकिस्तानचे स्वप्न उद्ध्वस्त केले.

टीम इंडियाच्या विजयाचे सर्वात मोठे कारण

मधल्या फळीत उत्कृष्ट फलंदाजी

अहमदाबादमध्ये टीम इंडियाला सुरुवातीला शुबमन गिल आणि विराट कोहलीच्या रूपाने पहिला मोठा धक्का बसला, पण रोहित शर्मा 86 आणि श्रेयस अय्यर नाबाद अर्धशतकीय धावसंख्येमुळे टीम इंडियाला 192 धावा करता आल्या. (हे देखील वाचा: Rohit Sharma 300 Six In ODI: पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माचा मोठा पराक्रम, वनडेमध्ये 300 षटकार केले पुर्ण)

सुरुवातीपासूनच शाहीन आफ्रिदीवर चढवला हल्ला 

टीम इंडियाने दोन विकेट गमावल्यानंतर सलामीवीर रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली आणि 16.4 षटकात 121 धावांची शतकी भागीदारी केली. या दोन्ही फलंदाजांनी पाकिस्तानचे प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हारिस रौफ यांच्याविरुद्ध सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत अनेक धावा केल्या. श्रेयस अय्यरने आपल्या उत्कृष्ट खेळीत 3 चौकार आणि 2 मोठे षटकार लगावले. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माने 86 धावांच्या स्फोटक खेळीत सहा चौकार आणि सहा गगनचुंबी षटकार ठोकले.

भारतीय गोलंदाजांचा कहर

संपूर्ण सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. टीम इंडियाच्या हाय व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाचे अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. गोलंदाजांनी टीम इंडियाला सामन्यात दमदार पुनरागमन करायला लावले.

सामन्याबद्दल

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असलेल्या पाकिस्तानने भारतासमोर 192 धावांचे लक्ष्य ठेवले होते. पाकिस्तानकडून बाबर आझम 50 आणि मोहम्मद रिझवानने 49 सार्वाधिक धावा केल्या. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने सात विकेट्सनी हा सामना जिंकला. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 86 आणि श्रेयस अय्यरने धावांची दमदार खेळी खेळली. टीम इंडियाचा पुढचा सामना 18 ऑक्टोबरला पुण्यात बांगलादेशशी होणार आहे.