टीम इंडिया (Photo Credit: PTI)

विराट कोहली भारताच्या कसोटी संघाचा (India Test Team) कर्णधार म्हणून पाय उत्तर झाल्यापासून त्याच्या उत्तराधिकारीची चर्चा जोर धरू लागली आहे. युवा खेळाडूंपासून ज्येष्ठ खेळाडूंचा देखील संघातील उच्च पदासाठी विचार केला जात आहे. केएल राहुल, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांची जावे चर्चेत असताना संघातील ज्येष्ठ वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami) आपल्यावर जी काही जबाबदारी दिली जाईल ती स्वीकारण्याची आपली तयारी असल्याचे स्पष्ट केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) 6 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आगामी मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी शमीला विश्रांती देण्यात आली आहे. शमी गेल्या काही महिन्यांपासून सतत खेळत असल्यामुळे भारताचे व्यस्त वेळापत्रक आणि वर्कलोड व्यवस्थापन धोरण विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे दिसत आहे. (विराट कोहलीच्या कसोटी कर्णधार उत्तराधिकारीच्या प्रश्नावर ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नचे भाष्य, म्हणाले- ‘अजिंक्य रहाणे आवडेल, पण...’)

“मी सध्या कर्णधारपदाचा फारसा विचार करत नाही. माझ्यावर कोणतीही जबाबदारी सोपवाल्यास मी तयार आहे. खरे सांगायचे तर, भारतीय संघाचे कर्णधारपद कोणाला द्यायचे नाही, परंतु ही एकमेव गोष्ट नाही आणि मी संघासाठी शक्य होईल त्या पद्धतीने योगदान देण्याचा विचार करीत आहे,” मोहम्मद शमीने India.com शी बोलताना सांगितले. शमी गेल्या काही वर्षांपासून भारतीय कसोटी संघाचा महत्त्वाचा सदस्य आहे, परंतु बंगालच्या वेगवान गोलंदाजाने हे देखील स्पष्ट केले आहे की तो सर्व फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे. तो पुढे म्हणाला, “मी सर्व फॉरमॅटमध्ये निवडीसाठी उपलब्ध आहे आणि जर तसे झाले तर मी त्याची वाट पाहत आहे.” कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा आघाडीचा गोलंदाज शमी दक्षिण आफ्रिकाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळू शकला नाही, ज्यामध्ये भारताचा 0-3 असा पराभव झाला.

मायदेशात परतलेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजचा तीन एकदिवसीय आणि तितक्याच T20 सामन्यांसाठी पाहुणचार करेल. पुनरागमन करणारा रोहित शर्मा आगामी व्हाईट-बॉल द्विपक्षीय मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करेल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 6, 9 आणि 11 फेब्रुवारी रोजी वनडे सामने खेळवले जातील तर T20I मालिका अनुक्रमे 16,18 आणि 20 फेब्रुवारी रोजी कोलकाताच्या प्रतिष्ठित ईडन गार्डन्सवर खेळली जाईल.