Tarak Sinha: रिषभ पंतची एमएस धोनीशी तुलना करणाऱ्यांवर प्रशिक्षक तारक सिन्हा भडकले, पाहा काय म्हणाले?
Rishabh Pant, MS Dhoni (Photo Credit: ICC)

भारताचा युवा विकेटकिपर रिषभ पंतने (Rishabh Pant) गेल्या सहा महिन्यात चांगली फलंदाजी केली आहे. रिषभने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेपासून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तो जवळपास एक वर्ष संघाबाहेर होता. मात्र, आता त्याने भारतीय संघातील पहिल्या अकरामध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या कामगिरीवर क्रिकेटविश्वातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तसेच तो येत्या काळात सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हणून ओळखला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, भारतीय संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी (Mahendra Singh Dhoni) पंत नेहमी तुलना केली जाते. परंतु, ही गोष्ट रिषभचे बालपणीचे प्रशिक्षक तारक सिन्हा (Tarak Sinha) यांना चांगलीच खटकली आहे. रिषभची धोनीशी होणारी तुलना बंद झाली पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत.

न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत तारक सिन्हा धोनीशी तुलना करण्याच्या प्रश्नावर म्हणाले की, "पंत नक्कीच गेम चेंजर आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने सुधार करतो. पण त्याची नेहमी धोनीशी तुलना करण्याची गरज काय आहे? हे समजून घेणे आवश्यक आहे की, धोनीनेही जगाला आपली क्षमता दाखवण्यासाठी वेळ घेतला होता. पंतच्या बाबतही थोड थांबले पाहिजे, त्याचीही वेळ येईल. पंतच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत पंतची धोनीशी तुलना केली जात होती. ज्यावेळी त्याच्याकडून विकेटमागे असताना काही गडबड झाल्यानंतर त्याची थट्टा केली जात. तसेच मैदावरही प्रेक्षकही धोनी-धोनी घोषणा देऊन त्याच्यावर दबाव आणायचे. ज्यामुळे तो संघाबाहेर होता. हे देखील वाचा- IPL 14 चे उर्वरित सामने UAE मध्ये रंगणार; BCCI ची माहिती

सिंन्ही पुढे म्हणाले की, रोहन गावस्कर हा एक वाईट खेळाडू नव्हता परंतु तो नेहमी आपल्या वडिलांच्या आसपास नसल्याचे त्याला आठवण करून दिली जात असे. पंतच्या बाबतीतही असेच झाले. दुसरा कोणी खेळाडू असता तर, आत्तापर्यंत अशा तुलनांमुळे तो दडपणाखाली आला असता. पण मी असे म्हणत आहे की पंतची इच्छाशक्ती आश्चर्यकारक आहे. त्याने आपले लक्ष सुधारणेवर ठेवले आहे. पंतला सांगण्यात आले होती की, तो फक्त एक प्रकारचे फटका मारू शकतो आणि लवकरच त्याने त्याच्या फलंदाजीत आणखी बरेच शॉट्स जोडले.