IPL 2021 (Photo Credits: Instagram/iplt20)

बीसीसीआय (BCCI) कडून यंदाचा आयपीएल 2021 (IPL 2021) हा सीझन भारतातील कोविड 19 परिस्थिती पाहता आता युएई (UAE) मध्ये खेळावला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. आज (29 मे) बीसीसीआय चेअरमॅन राजीव शुक्ला यांनी ही माहिती वृत्तसंस्थेसोबत बोलताना दिली आहे. दरम्यान आयपीएलच्या उर्वरित मॅचेस या अंदाजे 18,19 सप्टेंबर महिन्यापासून सुरू केल्या जातील अशी माहिती आहे तर अंतिम सामना ऑक्टोबर महिन्यात 9 किंवा 10 तारखेला होऊ शकतो. यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही.  यंदाच्या सीझन मधील 31 उरलेल्या सामन्यांसाठी 3 आठवड्यांचा कालावधी पुरेसा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आयपीएल चे सामने सप्टेंबर मध्ये सुरू करण्याचा निर्णय जरी झाला असला तरीही परदेशी खेळडूंची उपलब्धतादेखील तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. या निर्णयासाठी बीसीसीआयला टीम इंडियाच्या शेड्युल मध्ये बदल करावे लागणार आहेत. भारतासोबतच इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डला देखील राजी करावं लागणार आहे. IPL 2021 Phase-2: इंग्लंडने वाढवली BCCI ची डोकेदुखी, आयपीएलसाठी वेळापत्रकात बदल करण्याबाबत ECB प्रमुखने स्पष्ट केली भूमिका.

यंदा आयपीएलचा 14 वा सीझन आहे. 9 एप्रिल 2021 ला त्याची सुरूवात मुंबई आणि चैन्नई विरुद्ध सामना खेळून झाली होती. 25 दिवस या सीझनचे सामने उत्तमरित्या सुरू होते पण हळूहळू भारतात कोरोनाचे संकट गडद झालं आणि अहमदाबाद, दिल्लीमध्ये जसे संघ पोहचले तसे एक एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं. आणि मग मे महिन्यात यंदाचा आयपीएल रद्द करण्याचा निर्णय झाला. यानंतर परदेशी खेळाडू देखील मायदेशी परतले.

बीसीसीआय जर आयपीएल सीझन 14चं उरलेल्या सामन्यांचं आयोजन करू शकली नाही तर त्यांना अंदाजे 3 हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागणार आहे. अद्याप सामन्यांच्या अधिकृत तारखा, वेळापत्रक जाहीर झालेले नाही.