Abhisekh Verma (Photo Credit - X)

Tanya Singh Suicide Case: आयपीएल 2024 (IPL 2024) सुरू होण्यापूर्वी सनरायझर्स हैदराबादचा खेळाडू अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) मॉडेल तान्या सिंगच्या आत्महत्येमुळे (Tanya Singh Suicide Case) चर्चेत आला आहे. 19 फेब्रुवारी रोजी मॉडेल तान्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. यानंतर हैदराबादचा स्टार खेळाडू अभिषेकचेही नाव या प्रकरणात येऊ लागले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, त्यानंतर मोठा खुलासा झाला आहे. तान्याचे वडील भवानी सिंह यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली, त्यानंतर पोलिसांनी तान्याचा मोबाईल जप्त केला आणि त्याची संपूर्ण माहिती घेतली.

इंस्टाग्रामवर अभिषेकसोबत तान्याचे मिळाले काही फोटो

मिळालेल्या माहितीनुसार मोबाईलचा सीडीआर काढण्यात आला आहे. आता ते पुढील नोटीस पाठवतील. कुटुंबीयांचे जबाब घेण्यात येत आहेत. तसेच, तान्या मॉडेलिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये काम करायची. एसीपीने सांगितले की, इंस्टाग्रामवर अभिषेकसोबत तान्याचे काही फोटो आहेत, त्यांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, तान्याच्या मोबाईलवरून अभिषेकला मेसेज पाठवण्यात आले होते, मात्र भारतीय क्रिकेटपटूने त्या संदेशांना प्रतिसाद दिला नाही. गरज भासल्यास अभिषेक शर्मालाही याप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मात्र, अद्याप त्याच्याविरुद्ध पुरावे मिळालेले नाहीत.

तपासातही अभिषेकविरुद्ध काहीही निष्पन्न झाले नाही

सूरत पोलिसांचे एसीपी म्हणाले की, इंस्टाग्राम फोटोवरून अफवा पसरवली जात आहे की ते दोघे मित्र होते, या प्रकरणाचा तपास केला जात आहे. तान्याने अभिषेकला कोणताही कॉल केला नव्हता, तिने फक्त मेसेज केले होते, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 23 वर्षीय अभिषेक नुकताच रणजी ट्रॉफीमध्ये व्यस्त होता. तो रणजी करंडक एलिट ग्रुप सी चा शेवटचा साखळी सामना पंजाबसाठी 16 ते 19 फेब्रुवारी दरम्यान तामिळनाडू विरुद्ध खेळला. पंजाबचा प्रवास साखळी फेरीतच संपला. आता तो आयपीएलच्या तयारीत व्यस्त असेल. आयपीएलच्या मागील हंगामात त्याने 11 सामन्यात 226 धावा केल्या होत्या. तसेच 9 विकेट्स घेतल्या. 2018 ते 2023 दरम्यान आयपीएलमध्ये खेळल्या गेलेल्या एकूण 47 सामन्यांमध्ये त्याने 893 धावा केल्या, ज्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. एकूण 9 विकेट घेतल्या.