T20 World Cup स्पर्धेत फक्त ‘या’ सात फलंदाजांनी ठोकले शतक; विराट कोहली, रोहित शर्मा नव्हे ‘या’ भारतीय दिग्गज खेळाडूच्या नावावर एकमेव शतक
आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2020 ट्रॉफी  (Photo Credits: Getty Images)

T20 World Cup Centuries: आयसीसी टी-20 वर्ल्ड कप (ICC T20 WC) स्पर्धेत आजपर्यंत केवळ सात फलंदाज आहेत ज्यांनी शतक झळकावले आहे. या स्पेशल क्लबमध्ये सुरेश रैनाने  (Suresh Raina) भारताकडून (India) एकमेव शतक झळकावले आहे. या स्पर्धेत भारताचा दुसरा कोणताही फलंदाज शतक करू शकला नाही. भारताच्या मर्यादित ओव्हर संघाची आदर्शीला असेललेले विराट कोहली (Virat Kohli) व रोहित शर्मा (Rohit यांचे टी-20 वर्ल्ड कप शतक अवघ्या काही धावांनी हुकले.  क्रिस गेल जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याच्या नावावर दोन टी-20 विश्वचषक शतके आहेत. तसेच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत एका फलंदाजाने सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या 127 धावा केल्या आहेत, ज्या न्यूझीलंडचा (New Zealand) माजी क्रिकेटपटू ब्रेंडन मॅकलम (Brendon McCullum) यांच्या नावावर आहे. मॅकलमने 2012 टी-20 विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध 58 चेंडूत रेकॉर्ड-ब्रेक खेळी खेळली होती. (T20 World Cup: टीम इंडियाचे 2016 टी-20 वर्ल्ड कप संघाचे ‘हे’ 10 स्टार सदस्य 2021 मध्ये खेळणार नाहीत)

दुसरीकडे, रैनाबद्दल बोलायचे झाले तर त्याने 2010 टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 101 धावांची अविस्मरणीय खेळी खेळली होती. गेलने 2007 आणि 2016 टी-20 विश्वचषकात शंभरी पार केली होती. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषक स्पर्धेत फक्त न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, पाकिस्तान, भारत, बांगलादेश आणि श्रीलंका या देशातील खेळाडूंनी आतापर्यंत शतकी धावसंख्या गाठली आहे. दरम्यान, ब्रेंडन मॅकलमने टी-20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा केल्या असून गेल 117 धावांसह या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडचा अॅलेक्स हेल्स (नाबाद 116), पाकिस्तानचा अहमद शहजाद (111), बांगलादेशचा तमिम इक्बाल (नाबाद 103), सुरेश रैना (101), क्रिस गेल (100) आणि महेला जयवर्धने (100) यांचा समावेश होतो.

दरम्यान,  कोहलीची सर्वोत्तम वैयक्तिक धावसंख्या टी-20 विश्वचषकात नाबाद 89 असून रोहित नाबाद 79 धावांसह या यादीत खूपच खाली आहे. आतापर्यंत सहा टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळल्या गेल्या आहेत आणि सातवा टी-20 वर्ल्ड कप 17 ऑक्टोबरपासून संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि ओमान यूएलजे खेळला जाणार आहे.