मॅट क्रॉस (Photo Credit: Instagram)

न्यूझीलंड (New Zealand)आणि स्कॉटलंड (Scotland) यांच्यातील ICC T20 विश्वचषक 2021 सामना सुरू आहे. या सामन्यावर अनेक भारतीय प्रेक्षक देखील दूरचित्रवाणीच्या पडद्यासमोर बसले आहेत, कारण स्कॉटलंडचा विजय निश्चितपणे भारताच्या सेमीफायनल गाठण्याच्या संधी वाढवतो, ज्यांना अजून तीन सामने खेळायचे आहेत. जर विराट कोहली अँड कंपनीने अफगाणिस्तान (Afghanistan), स्कॉटलंड आणि नामिबियाला मोठ्या फरकाने पराभूत केले तर ते त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी न्यूझीलंडपेक्षा खूप पुढे जाऊ शकतात. रविवारी झालेल्या एकतर्फी सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा (Team India) पराभव केला होता. पण असे होण्यासाठी केन विल्यमसनच्या नेतृत्वातील किवी संघाला आधी स्कॉटलंड आणि अफगाणिस्तानकडून पराभव पत्करावा लागेल. न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड सामन्यादरम्यान एक रंजक घटना घडली. (NZ vs SCO, T20 World Cup 2021: विराट कोहलीच्या ‘या’ खास क्लबमध्ये न्यूझीलंडच्या Martin Guptill ची एन्ट्री, असा कारनामा करणारा बनला दुसरा फलंदाज)

किवी फलंदाजी दरम्यान स्कॉटिश यष्टीरक्षक मॅथ्यू क्रॉसने त्याचा सहकारी गोलंदाज क्रिस ग्रीव्हजला सांगितले की, “संपूर्ण भारत तुमच्या पाठीशी उभा आहे.” क्रॉसचे असे हे शब्द माईक स्टंपमध्ये रेकॉर्ड झाले. विशेष म्हणजे टी-20 विश्वचषकात भारताने सुरुवातीचे दोन सामने गमावले आहेत. आज अफगाणिस्तानचा सामना भारताशी आहे आणि उपांत्य फेरी गाठण्याच्या आशा पल्लवित ठेवण्यासाठी भारताला हा सामना कोणत्याही जिंकणे गरजेचे आहे. मॅथ्यू क्रॉसची ही कमेंट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. आयसीसीने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ग्रीव्ह्स हा स्कॉटलंडचा आतापर्यंतच्या स्पर्धेत बॅट आणि बॉल या दोन्हीसह सातत्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू आहे. 6 सामन्यांमध्ये त्याने 84 धावा केल्या आहेत व त्याने चार विकेट्स देखील घेतल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यातील गट 2 च्या सामन्यात बुधवारी स्कॉटलंडने न्यूझीलंडविरुद्ध नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. पण सलामीवीर मार्टिन गप्टिलच्या दमदार 93 वैयक्तिक धावांच्या बळावर ब्लॅककॅप्सने 172 धावांपर्यंत मजल मारली. टीम इंडिया अफगाणिस्तान (3 नोव्हेंबरला), स्कॉटलंड (5 नोव्हेंबरला) आणि नामिबिया (8 नोव्हेंबरला) यांच्याशी भिडणार आहे. याशिवाय नेट रनरेटच्या बाबतीत त्यांना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान संघांना पछाडण्यासाठी तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकायचे आहेत. तसेच अन्य संघाचे निकाल देखील त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहेत.