T20 World Cup 2021 मध्ये रोहित शर्माचा ओपनिंग पार्टनर म्हणून विराट कोहलीची निवड झाली? पाहा काय म्हणाले मुख्य निवडकर्ते
रोहित शर्मा आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

इंग्लंडविरुद्ध (England) घरेलू मालिकेत मार्च महिन्यात विराट कोहली (Virat Kohli) पाचव्या टी-20 सामन्यात भारतासाठी (India) यशस्वीरित्या सलामी उतरला आणि त्याने पुढे कबूल केले की तो पुढे जाऊन आघाडीवर जाऊन रोहितला “निश्चितपणे साथ द्यायका आवडेल.” पण टी -20 विश्वचषक संघासाठी (T20 WC India Squad) त्याला भारतासाठी तीन सलामीवीरांपैकी म्हणून निवडले गेले नाही. रोहित शर्मा (Rohit Sharma), केएल राहुल आणि आसन किशन हे संघातील “फक्त तीन सलामीवीर” आहेत, संघाच्या घोषणेदरम्यान निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी भर दिला. कोहलीने अहमदाबादमध्ये त्या सामन्यात 52 चेंडूत नाबाद 80 धावा केल्या होत्या. त्यावेळी तो केएल राहुलच्या जागी सलामीला आला होता ज्याने पहिल्या चार सामन्यांमध्ये अनुक्रमे 1, 0, 0, 14 अशा धावा काढल्या होत्या. या डावपेचने भारताला सहावा गोलंदाज खेळण्याची संधी दिली. (T20 World Cup 2021: भारतीय संघातून शिखर धवनचा पत्ता कट, पण टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक संघात असे करू शकतो पुनरागमन)

तथापि, चेतन यांनी कोहलीला आघाडीवर खेळण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनावर सोडला. “जर व्यवस्थापनाला वाटत असेल की विराटला परिस्थितीनुसार सलामीवीर म्हणून खेळायला हवे, तर ते त्यांच्यावर अवलंबून आहे... स्पर्धेदरम्यान काय परिस्थिती आहे ते फक्त सांगेल पण यावेळी, आमच्याकडे फक्त तीन सलामीवीर आहेत,”निवडकर्त्यांचे अध्यक्ष म्हणाले. दरम्यान, राहुलला संघात “अस्सल सलामीवीर” म्हणून निवडण्यात आले आहे आणि गरज पडली तरच तो विकेट्स राखेल, असे चेतन म्हणाले तर किशनला तिसरा सलामीवीर म्हणून संघात स्थान मिळाले. त्याने संघात स्थान मिळवण्यासाठी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सारख्या खेळाडूंना मागे टाकले. दुसरीकडे, अहमदाबादमध्ये कोहली सलामीला उतरल्यामुळे भारताने सहावा गोलंदाज म्हणून नटराजन खेळवले. मात्र वर्ल्ड कप स्पर्धेसाठी नटराजनला भारताच्या संघात स्थान मिळाले नाही. त्याऐवजी टीम इंडियात जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी असे तीन वेगवान गोलंदाज आहेत. तसेच हार्दिक पंड्या चौथा गोलंदाज आहे.

भारताचा 15 सदस्यीय संघ खालीलप्रमाणे आहे -

विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.

स्टँडबाय खेळाडू - श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर.