T20 World Cup 2021: भारतीय संघातून शिखर धवनचा पत्ता कट, पण टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक संघात असे करू शकतो पुनरागमन
शिखर धवन (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 स्पर्धेसाठी 15 सदस्यीय संघातून शिखर धवनला (Shikhar Dhawan) वगळणे हा कदाचित निवड बैठकीची सर्वात मोठा चर्चेचा विषय बनला आहे. डावखुरा फलंदाज फक्त दोन महिन्यांपूर्वी भारतीय संघाचे नेतृत्व करत होता पण आयसीसी (ICC) स्पर्धेत त्याला अपेक्षित असा भाव मिळाला नाही. त्याला स्टँडबाय लिस्टमध्येही स्थान मिळाले नाही. 2013 पासून संघाचा नियमित सदस्य, धवनची टी-20 मधील लय गेल्या काही वर्षांत घसरली आहे परंतु सध्याच्या संघातील सर्वात वरिष्ठ सलामीवीर शिवाय आयसीसी स्पर्धेत जाणे अनेकांना चकित करणारे आहे. धवनची जागा कोणी घेतली नाही कारण संघात फक्त दोन सलामीवीर आहेत रोहित शर्मा (Rohit Sharma) व केएल राहुल (KL Rahul). तसेच ईशान किशन (Ishan Kishan) देखील सलामीला येऊ शकतो, ज्याने श्रेयस अय्यरची जागा घेतली आहे. त्यामुळे धवनची टी-20 कारकीर्द संपली आहे असा विचार करणारे कदाचित चुकीचे आहेत. तो लूपमध्ये आहे आणि आयपीएल (IPL) 2021 च्या यूएईच्या लेगमध्ये त्याला पुनरागमन करताना पहिले जाऊ शकते. (T20 World Cup 2021: भारतासाठी टी-20 विश्वचषकात ‘हा’ खेळाडू X-फॅक्टर ठरू शकतो!)

भारताने टी-20 विश्वचषक 2021 साठी त्यांच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा केली असली तरी ते 10 ऑक्टोबरपर्यंत त्यात बदल करू शकतात आणि 19 सप्टेंबर रोजी यूएईमध्ये सुरु होणाऱ्या आयपीएल 2021 मधील त्यांच्या कामगिरीवर अवलंबून खेळाडूंची जागा घेऊ शकतात. स्पर्धेचा साखळी टप्पा 8 ऑक्टोबर रोजी संपेल आणि वादात सापडलेल्यांना अद्यापही प्रभावित करण्याची संधी आहे. दरम्यान, धवनच्या क्षमतेच्या खेळाडूकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, विशेषत: यूएईमध्ये, जिथे त्याने आयपीएल 2020 मध्ये 44.14 च्या सरासरीने 618 धावा केल्या आहेत. धवन व्यतिरिक्त, युजवेंद्र चहल सारख्या ज्येष्ठ खेळाडूलाही संधी आहे आणि 15 सदस्यीय संघातील संघर्ष असेल तर निवड समिती वरिष्ठ फिरकीपटू सामील करू शकतो. तसेच पृथ्वी शॉ देखील निराश असू शकतो आणि त्याची आक्रमक फलंदाजी शैली दुर्लक्षित करण्यासारखी नाही आहे.

निवडकर्त्यांनी संघात पूर्णपणे बदल करणे अपेक्षित नाही परंतु कामगिरीवर अवलंबून एक किंवा दोन बदल करणे नाकारता येत नाही कारण आयसीसीचे नियम संघांना तसे करण्याची परवानगी देतात.