आयसीसी टी-20 विश्वचषक (ICC T20 World Cup) 2021 स्पर्धेत चाहत्यांना चित्तथरारक पहिल्या उपांत्य फेरीचा सामना अनुभवायला मिळाला. 2019 विश्वविजेतेपदाची हुलकावणी मिळालेल्या केन विल्यम्सनच्या न्यूझीलंडने (New Zealand) इंग्लंडसोबत (England) हिशोब चुकता करत अंतिम फेरीत प्रवेश नोंदवला. केन विल्यम्सनच्या किवी संघाच्या ऐतिहासिक विजयात सलामीवीर डॅरिल मिशेल, डेव्हॉन कॉन्वे आणि जेम्स नीशम यांनी निर्णायक भूमिका बजावली. मिशेल जबरदस्त फलंदाजी करत अखेरपर्यंत नाबाद राहिला. तर त्याने कॉन्वे आणि नीशमसह अर्धशास्तकी भागीदारी करून संघाचा विजय निश्चित केला. उल्लेखनीय म्हणजे या पराभवासह आता इंग्लंडची घरवापसी होणार आहे तर न्यूझीलंड पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. तसेच लक्षात घ्यायचे की न्यूझीलंडविरुद्ध ब्रिटिश संघाला क्रिस जॉर्डन (Chris Jordan) आणि जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) यांच्या चुका चांगल्याच महागात पडल्या. (ENG vs NZ, T20 World Cup 2021: न्यूझीलंडने हिशोब चुकता केला, नाट्यमय सामन्यात इंग्लंडचा पराभव करून मिळवले सलग तिसऱ्या फायनलचे तिकीट)
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 विश्वचषकच्या पहिल्या सेमीफायनल सामन्यात दोन्ही संघाकडून जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. न्यूझीलंडच्या डावातील 13व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डॅरिल मिशेलने आदिल रशीदच्या चेंडूवर सलग षटकार मारण्याचा प्रयत्न केला. पण जॉर्डनने एक निश्चित षटकार रोखण्यासाठी मैदानावरील जागरूकतेने हवेत उडी कारून षटकार वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा पाय सीमारेषेला लागल्याने अंपायरने षटकार दिला. त्यानंतर दुसरी चूक म्हणजे 17 व्या षटकात जॉर्डनच्या ओव्हरपीच चेंडूवर जिमी नीशमने पहिला षटकार खेचला तेव्हा तो शॉट षटकारासाठी जात होता, पण सीमारेषेवर तैनात असलेल्या बेअरस्टोने चेंडू सीमारेषेच्या आत फेकला आणि लियाम लिव्हिंगस्टोनने त्याचा झेल घेतला. इंग्लिश संघ कॅचचा आनंद साजरा करत होता पण रिप्ले पाहिल्यावर बेअरस्टोचा गुडघा सीमारेषेला लागला आणि नीशमच्या खात्यात 6 धावा जमा झाल्याचे स्पष्टपणे दिसले. यामुळे इंग्लंडने मोठी विकेट काढण्याची संधी गमावली. त्यानंतर नीशमने अशाप्रकारे फलंदाजी सुरूच ठेवली आणि मिशेल सोबत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
जॉनी बेअरस्टो
View this post on Instagram
क्रिस जॉर्डन
View this post on Instagram
इंग्लंडविरुद्ध 11 चेंडूत 27 धावांच्या तुफानी खेळीत नीशमने 3 षटकार आणि 1 चौकार मारून सामना किवी संघाकडे वळवला. यादरम्यान त्याने जॉर्डनच्या एकाच षटकात 23 धावा काढल्या. अशाप्रकारे मिशेल आणि नीशम यांचे झेल सोडणे ब्रिटिश संघाला नक्कीच महागात पडले असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.