भारत विरुद्ध इंग्लंड (Photo Credit: PTI)

टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) 2021 ची यूएईमध्ये सुरुवात झाली आहे आणि सोमवारी दुबईत झालेल्या भारताने (India) इंग्लंडचा (England) त्यांच्या पहिल्या सराव सामन्यात 7 गडी राखून पराभव केला. केएल राहुल आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांनी अनुक्रमे अर्धशतकी खेळी केली तर मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराहने बॉलने इंग्लंड खेळाडूंवर हल्ला चढवला. आयपीएलनंतर पहिल्यांदा भारतीय जर्सीत परतलेल्या टीम इंडियाने (Team India) आपल्या पहिले सामन्यात संघ म्हणून प्रभावी भूमिका बजावली. तथापि यादरम्यान संघाच्या काही कमजोर कडी देखील चाहत्यांच्या नजरेत आल्या. ज्यांच्यात लवकरात सुधार करण्याची संघात गरज आहे. अश्विन आर्थिकदृष्ट्या चांगली गोलंदाजी केली असली तर त्याला एकही विकेट मिळाली नाही. तसेच त्याचा फिरकी साथीदार राहुल चाहरने एक विकेट घेतली पण 43 धावा दिल्या. टीम इंडियाच्या कमजोर कडी खालीलप्रमाणे आहेत... (T20 World Cup मध्ये टीम इंडियासाठी धावा करण्यात ‘हा’ फलंदाज आहे अग्रेसर, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर)

सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

भारतीय संघासाठी मोठे चिंतेचं कारण या सामन्यातून समोर आले. आणि ते म्हणजे आयपीएलनंतर सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकमधेही पिछाडीवर असल्याचे सिद्ध झाले आहे. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी टी 20 विश्वचषक संघात सूर्यकुमारसाठी श्रेयस अय्यरसारख्या प्रतिभावान खेळाडूकडे दुर्लक्ष केले. अय्यरला राखीव खेळाडू म्हणून ठेवण्यात आले आहे. सोमवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी -20 विश्वचषकाच्या सराव सामन्यात यादव केवळ 8 धावांवर बाद झाला.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हार्दिक गोलंदाजी करत नसणे ही संघ व्यवस्थापनासाठी मोठी चिंता आहे. या आधारावर, भारत हार्दिकसोबत टिकून राहण्याची शक्यता नाही आणि 24 ऑक्टोबर रोजी विराट कोहलीची टीम इंडिया पाकिस्तानविरुद्ध टी-20 विश्वचषक मोहिमेची सुरुवात करण्यासाठी शार्दुल ठाकूरला संघी मिळण्याची आहे. मात्र, हार्दिकने बॉलिंग केली नसली तरी काही चौकार खेचुन तो 10 चेंडूत 12 चौकारांसह नाबाद राहिला आणि भारताने एक ओव्हर शिल्लक असताना धावसंख्येचे लक्ष्य गाठले.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

इंग्लंडविरुद्ध या वेगवान गोलंदाजाने चार षटकांत 54 धावा दिल्या, आणि तीन वाईड चेंडू टाकत एकही विकेट न घेतली नाही. तो आयपीएलमध्ये त्याच्या फॉर्ममध्ये दिसत होता, जिथे त्याने फक्त सहा विकेट्स घेतल्या. याशिवाय तो लयीतही दिसत नाही. त्याच्यात सरावाची कमतरता दिसत आहे.