टीम इंडिया (Photo Credit: Twitter/ICC)

2007 नंतर ही पहिलीच वेळ आहे की आयसीसी(ICC) स्पर्धेच्या बाद फेरीपूर्वी टीम इंडिया (Team India) बाहेर पडली आहे. माजी कर्णधार आणि भारतातील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूंपैकी एक कपिल देव (Kapil Dev) यांनी ICC टी-20 विश्वचषक 2021 मध्ये टीम इंडियाला बाद फेरीत न पोहोचवल्याबद्दल सध्याच्या खेळाडूंची तीव्र टीका केली आहे. भारताच्या या कामगिरीसाठी कपिल देव यांनी इंडियन प्रीमियर लीगलाही (Indian Premier League) जबाबदार धरले आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला साखळी फेरीतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये सलग पराभवाला सामोरे जावे लागले. पाकिस्तान (Pakistan) आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे स्पर्धेतून बाहेर पडणे जवळपास निश्चित झाले होते आणि रविवारी अफगाणिस्तानविरुद्ध न्यूझीलंडच्या विजयाने भारताचे दरवाजे पूर्णपणे बंद झाले. बीसीसीआयने (BCCI) माजी विश्वविजेते आयसीसी वर्ल्ड 2021 च्या आवृत्तीत केलेल्या ‘चुका’ टाळतील याची खात्री करण्यासाठी क्रिकेटच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असे महान अष्टपैलू कपिल देव यांचे मत आहे. (ICC T20 World Cup च्या 7 व्या हंगामात टीम इंडिया चौथ्यांदा ग्रुप स्टेज मधेच धराशाही, दुसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा या स्पर्धेतही कायम)

आयसीसी विश्व टी-20 2021 मधील भारताच्या खराब मोहिमेवर बोलताना माजी भारतीय कर्णधार कपिल म्हणाले की खेळाडूंनी सर्वोच्च स्तरावर आशियाई दिग्गजांचे प्रतिनिधित्व केल्याचा अभिमान बाळगला पाहिजे. “जेव्हा खेळाडू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलला प्राधान्य देतात, तेव्हा आम्ही काय म्हणू शकतो? खेळाडूंनी त्यांच्या देशासाठी खेळण्याचा अभिमान बाळगला पाहिजे. मला त्यांची आर्थिक स्थिती माहित नाही त्यामुळे जास्त काही सांगू शकत नाही,” कपिलने एबीपी न्यूजला सांगितले. आयपीएल (IPL) 2021 चा दुसरा टप्पा COVID-19 महामारीमुळे पुन्हा शेड्यूल करण्यात आला होता. लीगचा 14वा हंगाम आयसीसी इव्हेंट सुरू होण्याच्या केवळ 2 दिवस आधी संपला. “मला असे वाटते की प्रथम देशाचा संघ असावा आणि नंतर फ्रँचायझी. मी असे म्हणत नाही आहे की तेथे क्रिकेट खेळू नका (आयपीएल), परंतु आता जबाबदारी बीसीसीआयवर आहे की त्याचे क्रिकेटचे चांगले नियोजन करावे. आम्ही केलेल्या चुकांची पुनरावृत्ती होऊ नये. या स्पर्धेतील आमच्यासाठी सर्वात मोठी शिकवण आहे,” कपिल म्हणाले.

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया सोमवारी आयसीसी विश्व T20 2021 चा अंतिम सामना नामिबियाविरुद्ध खेळणार आहे. कर्णधार कोहली नामिबियाविरुद्ध अंतिम सामन्यानंतर भारताच्या टी-20I कर्णधारपदावरून पायउतार होणार आहे. “मला वाटते की आयपीएल आणि विश्वचषकामध्ये काही अंतर असावे. पण हे नक्कीच आहे की आज आमच्या खेळाडूंकडे भरपूर एक्सपोजर आहे पण ते त्याचा पुरेपूर फायदा घेऊ शकले नाहीत,” कपिल पुढे म्हणाले.