टीम इंडिया (Photo Credit: PTI)

T20 world cup 2021: विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया (Team India) यंदा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाची प्रबळ दावेदार मानली जात होती. या टीममध्ये एकापेक्षा जास्त जागतिक दर्जाचे खेळाडू आहेत ज्यांच्याकडे कोणत्याही परिस्थितीत काहीही करण्याची आणि मोक्याच्या क्षणी सामना खेचून आणण्याची पूर्ण क्षमता आहे. देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येमधून टी-20 विश्वचषक 2021 साठी भारतीय संघात (Indian Team) केवळ 15 खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्या सर्वांमध्ये किती क्षमता असेल हे उघड आहे. पण आता अशा सर्वच खेळाडूंच्या क्षमतेवर प्रश्न निर्माण झाले आहेत जे एवढ्या मोठ्या स्पर्धेत आपल्या संघाला ग्रुप स्टेजच्या पुढे नेऊ शकले नाहीत. भारताने अखेर 2007 मध्ये टी-20 विश्वविजेतेपद जिंकले होते. (T20 World Cup 2021 Semi-Final Schedule: टी20 विश्वचषक उपांत्य फेरीत कोणता संघ कोणाशी भिडणार? जाणून घ्या संपूर्ण शेड्युल)

टीम इंडियाला यंदा एक सोपा गट मिळाला ज्यामध्ये अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियासारखे कमकुवत संघ होते. तर पाकिस्तान आणि न्यूझीलंडचे मजबूत संघ होते परंतु भारतीय संघाला या दोंघांविरुद्ध पराभवाचे तोंड पाहावे लागले ज्याने त्यांचे जेतेपदाचे स्वप्न भंग केले. यंदा प्रत्येक सामन्यात नाणेफेकीने महत्त्वाची भूमिका बजावली असे मान्य केले पण अशाच विषम परिस्थितीवर मात करण्यासाठी टीम इंडियात अशा मोठ्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 विकेटने पराभव केला, पण मग काय दुसर्‍याच सामन्यात न्यूझीलंडचा 8 विकेट्सनी पराभव झाला, त्यामुळे पहिल्या सामन्यातून आम्ही काही शिकलो नाही. दोन सामने गमावल्यानंतरही उपांत्य फेरी गाठण्यासाठी इतर संघांच्या कामगिरीवर अवलंबून राहावे अशी स्थिती झाली होती. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला संघ अशा स्थितीत पोहोचणे ही संपूर्ण देशासाठी निराशाजनक स्थिती होती.

अखेरीस अफगाणिस्तानला पराभूत करून न्यूझीलंडने भारताचे स्वप्न चक्काचूर केले. अफगाणिस्तान आणि स्कॉटलंडसारख्या संघावर साखळी फेरीत विजय मिळवून टीम इंडियाने काय साध्य केले? यंदाच्या सापरधेत टीम इंडियाची जी स्थिती झाली त्याला कोणतेही कारण किंवा स्पष्टीकरण पुरेसे नाही. उलट यासाठी जबाबदार खेळाडू आहेत जे त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी करू शकले नाहीत. या पराभवातून भारतीय संघ धडा घेतील असे अपेक्षित आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, आर अश्विन सारखे खेळाडू एमएस धोनीसारखा मार्गदर्शक आणि रवि शास्त्रीसारखे मुख्य प्रशिक्षक असूनही जर संघाची अशी स्थिती झाली तर पुन्हा नव्याने सुरुवात करण्याची गरज असल्याचे इथे दिसते.