अक्षय कुमार व शाहीन आफ्रिदीचा ओव्हरथ्रो (Photo Credit: Instagram)

भारत ((India) आणि पाकिस्तान (Pakistan) संघात टी-20 विश्वचषकचा (T20 World Cup) मनोरंजक सामना पाहायला मिळत आहे. दुबई (Dubai) आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) 57 धावांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने सात विकेट गमावून 151 धावांपर्यंत मजल मारली. भारताच्या या आश्वासक धावसंख्येत पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने (Shaheen Afridi) देखील मोलाचे योगदान दिले. आफ्रिदीने सुरुवातीला रोहित शर्मा व केएल राहुल या सलामी जोडीला स्वस्तात बाद करून भारताला जबरदस्त झटका दिला. त्यानंतर मोक्याच्या क्षणी त्याने कोहलीला देखील आऊट करून माघारी धाडलं. टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारतीय कर्णधार विराटला बाद करणारा तो पहिलाच पाकिस्तानी गोलंदाज ठरला आहे. पण डावाच्या 19 व्या ओव्हरमध्ये एक मोठी चूक केली ज्यामुळे दुबई स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय संघाच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आणि त्यांनी टाळ्यांचा गजर केला. (T20 WC 2021, IND vs PAK: दुबईत Virat Kohli पुढे पाकिस्तानी गोलंदाज हतबल, पण Shaheen Afridi ने काढला ‘रनमशीन’चा तोडगा)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चुरशीच्या सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. यामध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचाही समावेश होता. आजचा क्रिकेट विश्वातील या कट्टर प्रतिस्पर्धी संघातील सामना पाहण्यासाठी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री रौतेला देखील दुबईत उपस्थित होते. या सामन्यात टीम इंडिया नियमित अंतराने विकेट गमावत असल्याने चाहत्यांची निराशा झाली, पण विराट कोहली एकाबाजूने तग धरून खेळत राहिला ज्याने संघाला थोडा दिलासा मिळाला. टी-20 विश्वचषक सुपर 12 च्या लढतीत भारतीय डावाच्या अंतिम षटकात आफ्रिदीने शानदार गोलंदाजी केली पण अखेरीस त्याच्या एका ओव्हरथ्रोमुळे भारतीय संघाला चौकार आणि एक लेग-बाय असे एकूण पाच अधिक धावा मिळाल्या. आफ्रिदीच्या या चुकीमुळे बीसीसीआय सचिव जय शाह, अभिनेता अक्षय कुमार यांच्यासह स्टेडियममध्ये उपस्थित भारतीय चाहत्यांनी जोरजोरात टाळ्यांचा गजर करत आनंद साजरा केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान आजच्या सामन्यात कोहलीने एकहाती झुंज देत 49 चेंडूत 57 तर पंतने 39 धावा करत डाव सावरला. पाकिस्तानसाठी शाहीन आफ्रिदीने सर्व महत्त्वाच्या विकेट घेतल्या. यामध्ये रोहित शर्मा, सूर्याकुमार यादव आणि विराटचा समावेश आहे.