विराट कोहली (Photo Credit: PTI)

भारतीय कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli पाकिस्तान (Pakistan) विरुद्ध टी- विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पुन्हा एकदा आपला क्लास दाखवला आणि संघ अडचणीत असताना एका बाजूने तग धरून झुंजार अर्धशतक ठोकले. या दरम्यान कोहलीने रविवारी एक नवीन टप्पा गाठला आणि तो मर्यादित षटकांच्या आयसीसी (ICC) स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 500 हून अधिक धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. कोहलीने दुबईत पाकिस्तानविरुद्ध भारताच्या (India) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 च्या सलामीच्या सामन्यात ऐतिहासिक कामगिरी पार केली. आयसीसी स्पर्धांमध्ये कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध स्कोअर 16, 9, 78 नाबाद, 22 नाबाद, 36 नाबाद, 107, 55 नाबाद, 81 नाबाद, 5, 77, 57 असा आहे. कोहलीने या सामन्यात 57 धावांची जबरदस्त खेळी खेळली आणि संघाला मजबूत धाव संख्येपर्यंत पोहचण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. (IND vs PAK, T20 World Cup 2021: टीम इंडियाचे पाकिस्तानपुढे 152 धावांचे टार्गेट, Virat Kohli चे लढाऊ अर्धशतक; शाहीन आफ्रिदी भारताला नडला)

इतकंच नाही तर आजच्या सामन्यात विराटच्या फलंदाजीपुढे पाकिस्तानी गोलंदाज पुन्हा एकदा हतबल दिसले असले तरी पहिल्यांदा टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदा त्यांनी कोहलीला आऊट करून पॅव्हिलियनमध्ये पाठवण्याचा मोठा कारनामा केला आहे. आजच्या सामन्यापूर्वी टी-20 विश्वचषकात विराटने पाकिस्तानविरुद्ध तीन सामने खेळले असून तो या तिन्ही सामन्यांमध्ये नाबाद राहिला होता. म्हणजेच, झटपट क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधाराला आऊट करण्यात पाकिस्तानी गोलंदाज कधीच यशस्वी झाले नव्हते. पण आज पाकिस्तानचा घातक वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) कोणत्याही पाकिस्तानी गोलंदाजाला न जमलेली कमाल केली आहे. पण त्यापूर्वी कोहलीने डावखुरा वेगवान गोलंदाज आफ्रिदीविरुद्ध जबरदस्त फटकेबाजी केली. उल्लेखनीय आहे की आफ्रिदीने आपल्या दोन घातक इन-स्विंगर्ससह सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद करून भारताच्या फलंदाजीचा क्रमला जोरदार झटका दिला. पण कोहली संयमी फलंदाजी करत राहिला आणि अखेरीस टी-20 करिअरमधील 29 वे व पाकिस्तानविरुद्ध तिसरे अर्धशतक ठोकले.

रविवारी शाहीन आफ्रिदी आणि हसन अली यांनी टॉप-ऑर्डरला धक्का दिला आणि पॉवर-प्लेमध्ये संघाची स्थिती 31/3 अशी झाली असताना कोहलीने चौथ्या विकेटसाठी रिषभ पंतसोबत 53 धावांची भागीदारी रचून भारताचा डाव स्थिरावला. दरम्यान, रविवारी दोन्ही संघातील चुरशीच्या सामन्यापूर्वी भारताने 12-0 असा विक्रम कायम ठेवत विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानवर वर्चस्व कायम ठेवले आहे.