T10 League 2019: वेस्ट इंडियन चाडविक वॉल्टन याची पंजाबी ऐकून युवराज सिंह याला झाले हसू अनावर, पाहा हा मजेदार Video
(Photo Credit: Twitter/Yuvraj Singh)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंह (Yuvraj Singh) याने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर युवराज साधय परदेशी लीगमध्ये खेळत आहे. कॅनडा टी-20 लीगमध्ये खेळल्यानंतर युवराज आता अबूधाबीमध्ये सुरू असलेल्या टी-10 लीगमध्ये मराठा अरेबियन संघासाठी खेळत आहे. नेहमी सहकारी खेळाडूंबरोबर मौजमजा करणारा युवी या लीगमधील परदेशी खेळाडूंबरोबर मजा करत आहे. याचा पुरावा म्हणजे युवीने शेअर केलेला हा व्हिडिओ. युवराजने सोशल मीडियावर एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये युवराजसोबत वेस्ट इंडिजचा खेळाडू चडविक वॉल्टन (Chadwick Walton) दिसत आहे. चाडविक पंजाबीमध्ये काहीतरी बोलत आहे, ज्यानंतर युवराजला त्याचे हसू अनावर झाले. (T10 League 2019: KKR संघातून रिलीज केल्यानंतर क्रिस लिन याने टी10 लीगमध्ये खेळला तुफानी डाव, अलेक्स हेल्स याचा रेकॉर्ड मोडत रचला इतिहास)

या व्हिडिओमध्ये, चडविक युवराजला टी10 लीगमधील मॅच खेळण्यासाठी चालायास सांगत आहे. युवराज चडविकला पंजाबी भाषेतही उत्तर देतो, पण जमैकाच्या या खेळाडूची पंजाबी ऐकून युवीसुद्धा त्याच्या हसण्यावर नियंत्रण ठेवता आले नाही. व्हिडिओ बर्‍यापैकी मजेशीर आहे, ज्यामध्ये चडविक युवराजची पंजाबी कॉपी करण्याचा प्रयत्न करतो. पाहा व्हिडिओ:

टी -10 लीग सुरु होऊन काही दिवसच झाले आहेत. या स्पर्धेत युवराजने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत, परंतु त्यामध्ये त्याला काही खास कामगिरी करता आलेली नाही. युवराजने टी-10 लीगमध्ये पदार्पण करताना 10 धावा केल्या. यानंतर दुसर्‍या सामन्यात कालंदरविरुद्ध 14 धावा खेळत बाद झाला. दुसरीकडे, चडविक वॉल्टन वेस्ट इंडीजचा खेळाडू आहे, ज्याला 'रोप'च्या नावाने ओळखले जाते. वॉल्टन हा उजव्या हाताचा फलंदाज आणि यष्टीरक्षक आहे.