Syed Mushtaq Ali Trophy: 'हे पठाणचे हात आहेत ठाकूर', यूसुफ पठाण याच्या शानदार झेलवर रशीद खान याने अशी घेतली फिरकी, पहा Tweet
युसूफ पठाण (Photo Credit: Twitter)

क्रिकेट विश्वात फील्डिंगची पातळी अधिक उंचावली आहे. सर्व संघांनी फलंदाजी आणि गोलंदाजी तसेच क्षेत्ररक्षणातही अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. आणि याचे एक उदाहरण सय्यद अली मुश्ताक ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) मध्ये युसुफ पठाण (Yusuf Pathan) याच्या रूपात पाहायला मिळाली. ज्यानंतर आयपीएलमधील त्याचा सहकारी खेळाडू राशिद खान (Rashid Khan) याने अतिशय मजेदार पद्धतीने त्याचे कौतुक केले. क्षेत्ररक्षण जेव्हा चर्चा होते अष्टपैलू अष्टपैलू युसूफचे नाव मात्र पहिले येते. पठाणला एक चांगला फील्डर म्हणून ओळखला जात नाही. पण सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये त्याच्या पहिल्या सामन्यादरम्यान त्याने हवेत उडी मारून अतिशय शानदार झेल पकडला. (AUS vs PAK 3rd T20I: मिशेल स्टार्क याने गमावली हॅटट्रिकची संधी, शानदार चेंडूवर मोहम्मद रिजवान याला बोल्ड करत सर्वांना केले चकित, पाहा Video)

19 षटकांच्या 5 व्या चेंडूवर युसूफने गोवा संघाचा कर्णधार दर्शन मिसाळ (Darshan Misal) याला माघारी पाठवण्यासाठी हा झेल पकडला. युसूफचा भाऊ इरफानने (Irfan Pathan) या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहे. हा व्हिडिओ शेअर करताना इरफानने कॅप्शनमध्ये लिहिले, "तो पक्षी आहे का ? नाही हा युसूफ पठाण आहे... चांगला कॅच पकडला लाला. प्री हंगामातील सर्व तुमची परिश्रम फेडले आहेत". इरफानच्या ट्विटनंतर अफगाणिस्तान (Afghanistan) संघाचा कर्णधार रशीदने एक्सट्रा कव्हरवर युसुफच्या प्रयत्नांचे कौतुक करताना हास्यास्पद प्रतिक्रिया दिली. रशीदने लिहिले की, "खूप हुशार कॅच भाऊ, हे पठाणचे हात आहे ठाकूर." आयपीएलमध्ये राशिद आणि युसूफ सनरायझर्स हैदराबादकडून एकत्र खेळताना दिसतात. या दोन्ही खेळाडूंमध्ये चांगली मैत्रीही आहे. दरम्यान, आजच्या सामन्यात युसूफ फलंदाजीने काही कमाल करू शकला नाही.

आज सय्यद अली मुश्ताक ट्रॉफीमध्ये बडोद्याचा संघ आपला पहिला सामना खेळत होता. यात संघाने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गोवा (Goa) ने सुयश प्रभुदेसाई याच्या 60 धावांच्या मदतीने अखेरच्या षटकात 4 गडी राखून सामना जिंकला. यानंतर बडोदा (Baroda) संघाचा पुढील सामना कर्नाटक (Karnataka) संघाशी होईल.