Syed Mushtaq Ali Trophy 2021: विष्णू सोलंकीचा (Vishnu Solanki) तुफानी डाव आणि अखेरच्या चेंडूवर षटकाराच्या जोरावर बरोदा (Baroda) संघाने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या (Syed Mushtaq Ali Trophy) सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं. सोलंकीने नाबाद 71 डाव खेळला आणि अखेरच्या चेंडूवर एमएस धोनी स्टाईल जोरदार षटकार खेचला. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या तिसऱ्या क्वार्टर-फायनल सामन्यात बरोदाने युजवेंद्र चहलच्या हरियाणा (Haryana) संघाचा पराभव केला. बरोदा संघाला विजयासाठी एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता होती, परंतु विष्णूने सुमित कुमारच्या (Sumit Kumar) अंतिम चेंडूवर षटकार मारत संघाला दोन 8 विकेटने विजय मिळवून दिला. त्याने 41 चेंडूत चार चौकार व पाच षटकारांच्या मदतीने नाबाद अर्धशतक झळकावले तर त्याचा स्ट्राइक रेट 154.35 होता. दुसरीकडे, हरियाणासाठी कर्णधार चहल आणि सुमित यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. (Syed Mushtaq Ali Trophy 2021: पंजाब टीमपुढे गतविजेत्या कर्नाटकने टेकले गुडघे, तामिळनाडूने सेमीफायनलमध्ये बुक केले स्थान)
पहिले फलंदाजी करत हरियाणाने 20 ओव्हरमध्ये 7 बाद 148 धावांपर्यंत मजल मारली होती. हरियाणा लोअर ऑर्डरने आश्चर्यकारक काहीही केले नाही. राहुल तेवतिया (10), सुमित कुमार (नाबाद 20), अरुण छपराणा (6), रोहित शर्मा (1) काही खास कामगिरी करू शकला नाही. हरियाणाकडून एच राणाने 40 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. याशिवाय शिवम चौहानने 35 धावा, चैतन्य बिश्नोईने 21 धावा आणि सुमित कुमारने नाबाद 20 धावांचे योगदान दिले. बडोद्याकडून कार्तिकला दोन यश मिळाले तर ए सेठ आणि बी पठाण यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. 149 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बडोदाने सावध फलंदाजी केली. सलामी फलंदाज आणि कर्णधार केदार देवधर आणि समित पटेलने पहिल्या विकेटसाठी 33 धावांची भागीदारी केली. देवधरने43 आणि पटेलने21 धावा केल्या. चहलने दोघांची भागीदारी मोडली आणि पटेलला माघारी धाडलं.
Vishnu Solanki Finished off in Style 🚁🔥 #SMAT2021 pic.twitter.com/EIgWmntxCr
— Sharukh MSD™ (@StanMSD) January 27, 2021
त्यानंतर देवधरने सोलंकीसह दुसर्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे बरोदा संघाची धावसंख्या 100 पार गेली, पण दोघे धावगती वाढवू शकले नाही. 15व्या ओव्हरमध्ये देवधारही पॅव्हिलियनमध्ये परतला. अंतिम चेंडूवर संघाला 5 धावांची गरज होती आणि सोलंकीने धोनी-स्टाईल हेलिकॉप्टर शॉट खेळत चेंडू सीमारेषेपार पाठवला आणि बरोदा संघाचे अंतिम-4 मध्ये स्थान निश्चित केले. बरोदा वगळता पंजाब आणि तामिळनाडू संघाने सेमीफायनल बर्थ बुक केले आहे. आता अंतिम क्वार्टर-फायनल सामन्यात बिहार आणि राजस्थान यांच्यातील एक संघ अंतिम जागा भरेल.