सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali Trophy) टी-20 स्पर्धेच्या सेमीफायनल फेरीत पंजाब (Panjab) आणि तामिळनाडू (Tamil Nadu) संघाने स्थान निश्चित केले आहे. आपल्या गोलंदाजांनंतर फलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर तामिळनाडूने मंगळवारी मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात हिमाचल प्रदेशला 5 विकेट्सने पराभूत करत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये बरोदाच्या (Baroda) संघाने हरिणाला धुळ चारली. त्यानंतर बिहारच्या संघाला पराभूत करत राजस्थानच्या (Rajasthan) संघानेही आता सेमीफायनलमध्ये झेप घेतली आहे.
पहिल्या क्वार्टरफायनलमध्ये पंजाबने गतविजेत्या कर्नाटकला 9 विकेट्सने पराभूत करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर तामिळनाडू आणि हिमाचल यांच्यात खेळण्यात आलेल्या दुसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये तामिळनाडूने विजय मिळवला. तर, तिसऱ्या क्वार्टरफायनलमध्ये बरोदाच्या संघाने दमदार कामिगिरी करत जवळपास हरियाणाच्या हातात आलेले तिकीट हिसकावून सेमीफाइनलमध्ये दाखल झाला. यामुळे राजस्थान आणि बिहार यांच्यात होणाऱ्या चौथ्या क्वार्टरफायनलमध्ये कोणता संघ बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, या सामन्यात चांगली खेळी करत राजस्थानच्या संघाने बिहारला पराभूत केले आहे. हे देखील वाचा- Online Rummy Games: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला केरळ उच्च न्यायालयाचे नोटीस
सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पेर्धेचे दोन्ही सेमीफायनल शुक्रवारी 29 जानेवारीला अहमदाबादच्या सरदार पटेल मैदानात खेळला जाणार आहे. पहिली सेमीफाइनल तामिळनाडू आणि राजस्थान यांच्यात रंगणार असून हा सामना सामना दुपारी 12 वाजता सुरु होणार आहे. तर, दुसऱ्या सामन्यात पंजाब आणि बरोदा एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना दुपारी 4 वाजल्यापासून पाहता येणार आहे. दरम्यान, सेमीफाइनलमध्ये विजय मिळवणाऱ्या संघात 31 जानेवारीला फायनल सामना होणार आहे.