सुरेश रैनाने पुन्हा सुरु केला सराव (Photo Credit: Instagram/sureshraina3)

IPL 2020: युएईमध्ये उतरल्यानंतर एका आठवड्यानंतर डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने (Suresh Raina) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 मधून माघार घेतल्याची धक्कादायक घोषणा केली. चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) त्याच्या बाहेर पडण्यामागे वैयक्तिक कारण सांगितलं असली, तरी फ्रँचायझीच्या उप-कर्णधाराने सुरक्षेमुळे आपण भारतात परातल्याची पुष्टी केली. 'येलो आर्मी'चे 13 सदस्य कोविड-19 पॉसिटीव्ह आढळल्याच्या दोन दिवसानंतर रैना स्पर्धेतून बाहेर पडला. भारतात परतल्यानंतर रैनाने युएई (UAE) येथील परिस्थिती सुधारल्यास जाण्याचे संकेत दिले. सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांच्या म्हणण्यानुसार, रैनाच्या परतीबाबत अंतिम निर्णय आता कर्णधार एमएस धोनी आणि मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांच्या हाती आहे. चाहते अद्याप क्रिकेटपटूच्या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करत आहेत, तर रैना सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला जिथे तो सराव करताना दिसत आहे. (IPL 2020 Update: चेन्नई सुपर किंग्स संघाला दिलासा; सुरेश रैना पुन्हा CSK मध्ये दाखल होण्याची शक्यता)

रैनाने आपल्या या व्हिडिओने अनेकांना संभ्रमित केले. तो आयपीएलमध्ये (IPL) खेळण्यासाठी खेळण्यामध्ये युएई परतण्याचे आवाहन केले. रैनाला अजूनही परतण्याची इच्छा असल्याने फ्रँचायझीने अद्याप त्याची जागी दुसऱ्या फलंदाजाची गोधन केली नाही. रैनाशिवाय सीएसकेही हरभजन सिंहने देखील वैयक्तिक कारणास्तव यंदा आयपीएलमधून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

 

View this post on Instagram

 

✌️🏏✅

A post shared by Suresh Raina (@sureshraina3) on

यूजर्सने देखील रैनाला आयपीएलमध्ये परतण्याचे आवाहन केले 

युजर्सने रैना परतण्याचे केले आवाहन (Photo Credit: Instagram)
युजर्सने रैना परतण्याचे केले आवाहन (Photo Credit: Instagram)
युजर्सने रैना परतण्याचे केले आवाहन (Photo Credit: Instagram)

1 सप्टेंबर रोजी रैनाने आयपीएल 2020 मधून बाहेर पडून भारतात परतण्याचे कारण स्पष्ट केले. पंजाबच्या पठाणकोट जिल्ह्यात दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यामुळे त्याने परतण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा भारतीय क्रिकेटपटूने केला. “माझ्या कुटुंबासोबत पंजाबमध्ये जे काय झाले ते भयंकर होते. माझ्या काकाचा खून करण्यात आला, माझी आत्या आणि माझ्या चुलत भावंडं मृत्यूशी झगडत आहेत. दुर्दैवाने माझ्या चुलतभावाचेही काही दिवस आयुष्यासाठी झगडल्यानंतर काल रात्री निधन झाले. माझी आत्याची स्थिती अजूनही खूपच गंभीर आहे आणि ती व्हेंटिलेटरवर आहे,” रैनाने ट्विटरवर लिहिलं.