IPL 2020: सुरेश रैना-एमएस धोनीच्या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल; Thala आणि Chinna Thala च्या मैत्रीने नेटिझन्स झाले भावुक
सुरेश रैना आणि एमएस धोनीची भेट (Photo Credit: Video Screengrab)

29 मार्चपासून सुरू होणार्‍या इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्राकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत ज्यात जगभरातील दिग्गज आणि युवा क्रिकेटपटू आपला दम दाखवतील. आयपीएल (IPL) 2020 च्या अगोदर, सुरेश रैनाने (Suresh Raina) चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) आणि संघाच्या सराव सत्रापूर्वी इतर सहकाऱ्यांची भेट घेतली आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद वेगळाच होता. सीएसकेने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये रैना आपल्या आयपीएलचे जुने फोटो पाहताना दिसू शकतो. रैना भिंतीवरील चेन्नईच्या खेळाडूंचे लगावले जुने फोटो पहात आहे. तब्बल सात मंहिन्यानंतर क्रिकेटच्या मैदानावर परतणार्‍या धोनीचे चेन्नई सुपर किंग्जमधील सहकारी रैनाने जोरदार स्वागत केले. (CSK च्या सराव सत्रात झाले एमएस धोनी चे धमाकेदार स्वागत, स्टेडियममध्ये फॅन्सनी केला 'धोनी धोनी' चा गजर, पाहा Video)

अचानक धोनी मागूनून येतो ज्याला पाहून रैना त्याला मिठी मारून आनंद व्यक्त करतो. धोनीही रैनाची पाठ थोपटतो. टीम इंडियाचा मधल्या फळीतील फलंदाज रैना आणि धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पाहा हा व्हिडिओ:

सीएसकेच्या या व्हिडिओमध्ये रैना आणि धोनीची मैत्री चाहत्यांसाठी एक ट्रीट ठरली. सोशल मीडियावर 'थाला' आणि 'चिन्ना थाला' यांना अनेक महिन्यांनी एकत्र पाहून नेटकरी भावुक झाले. पाहा रैना-धोनीच्या भेटीवर यूजर्सच्या प्रतिक्रिया:

शब्द त्यांची मैत्री व्यक्त करू शकत नाही!!

थाला आणि चिन्नाथाला

#WhistlePodu सुरू करा

जेव्हा थाला चिन्नाथाला भेटतो

आयपीएलच्या इतिहासातील रैना हा एक सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे आणि त्याच्या नावावर अनेक रेकॉर्डस्ची नोंद आहे. आयपीएलमधील सर्वाधिक 5368 धावा करणारा रैना दुसर्‍या क्रमांकावर आहे. फलंदाजीबरोबरच, 33-वर्षीय रैनानेत्याच्या चित्तथरारक झेल आणि अविश्वसनीय फिल्डिंगसह मैदानात मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. 2010, 2011 आणि 2018 मध्ये चेन्नईला विजेतेपद जिंकवून देण्यात रैनाने निश्चितच महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आणि आता चौथे विजेतेपद मिळवण्याच्या इच्छेने चेन्नईचे मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक असेल. आयपीएलचा पहिला सामना 29  मार्च रोजी गेतजेत्या मुंबई इंडियन्सशी होईल. मुंबईने आजवर सर्वाधिक 4 वेळा आयपीएलचे जेतेपद जिंकले आणि स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनला.